Jump to content

इंदुमती पारीख

इंदुमती पारीख
जन्म ८ मार्च १९१८
मृत्यू १७ जून २००४
निवासस्थानमुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
वांशिकत्व भारतीय
नागरिकत्व भारतीय
शिक्षण डॉकटर
पेशा वैद्यकीय क्षेत्र
प्रसिद्ध कामे महिला व बाल कल्याण
पुरस्कार इंटरनॅशनल ह्युमिनिस्ट पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार


इंदुमती पारीख (रोमन लिपी: Indumati Parekh), (जन्म : ८ मार्च १९१८; - १७ जून २००४) व्यवसायाने डॉक्टर व एक बुद्धिवादी सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी मुंबईमधील झोपडपट्ट्यातील निवासी लोकांच्या उत्कर्षासाठी काम केले आहे. मुंबईमध्ये त्यांनी एम.एन. रॉय सेंटरची स्थापना केली. रॅडिकल ह्युमॅनिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या त्या अध्यक्षा होत्या.[]

'समाजविकासासाठी व्यक्तिविकास' हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे.

वैद्यकीय कार्य

वैद्यक क्षेत्रात त्या कौटुंबिक वैद्यक सल्लागार आणि कुटुंब नियोजन मार्गदर्शक म्हणून काम करीत. इ.स. १९८४ ते १९८९ या काळात भारत सरकार आणि फोर्ड फाऊंडेशन यांच्यासह त्यांनी सामान्य नागरिकांसाठी " डॉकटर नसेल तेव्हा.." या उपक्रमाचे दायित्व सांभाळले. इंग्रजी आणि मराठीमधील वैज्ञानिक नियतकालिकांत त्या सातत्याने लेखन करीत असत.[]

सामाजिक कार्य

इंदुमती पारीख यांनी सामाजिक क्षेत्रात प्रामुख्याने महिला आणि लहान मुले यांच्यासाठी काम केले. इ.स. १९६४ साली त्यांनी "स्त्रीहितकरणी" नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी निम्न आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांतील महिलांच्या कल्याणासाठी कार्य केले. या संस्थेने मुंबईतील बॉम्बहल्ले आणि दंगली यांच्या दरम्यान लोकांना मदत केली आहे.[]

सन्मान

  • फोर्ड फाऊंडेशनच्या अनुभव या वार्तापत्रात मानाचे स्थान.
  • इ.स. १९९२ साली इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट पुरस्कार[]
  • इ.स. १९९६ साली महिला आणि बालकल्याण या विषयासाठी जमनालाल बजाज पुरस्काराने गौरव[]

संदर्भ

  1. ^ "Dr.Indumati Parekh". innaiahn.tripod.com. 2018-06-17 रोजी पाहिले.
  2. ^ a b c Foundation, Jamnalal Bajaj. "Jamnalal Bajaj Foundation". Jamnalal Bajaj Foundation. 2018-06-17 रोजी पाहिले.
  3. ^ "IHEU Awards | IHEU". IHEU (इंग्रजी भाषेत). 2018-06-17 रोजी पाहिले.