Jump to content

इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी


इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी
दिग्दर्शन जेम्स मॅनगोल्ड
निर्मिती कॅथलीन केनेडी, फ्रँक मार्शल
प्रमुख कलाकारहॅरिसन फोर्ड, फ्रँक मार्शल, फीबी वॉलर-ब्रिज, अँतोनिया बांदेरास, जॉन ऱ्हिस-डेव्हिस, डोबी जोन्स
संकलन मायकेल मॅककस्कर, फ्रँक मार्शल, अँड्रु बकलँड, डर्क वेस्टरवेल्ट
छाया फेडॉन पापामायकेल
संगीतजॉन विल्यम्स
देश अमेरिका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २०२०
वितरक वॉल्ट डिस्नी पिक्चर्स
अवधी १५४ मिनिटे
निर्मिती खर्च ~३० कोटी अमेरिकन डॉलर
एकूण उत्पन्न ~३८ कोटी ३९ लाख अमेरिकन डॉलर
संकेतस्थळअधिकृत संकेतस्थळ
आय.एम.डी.बी. वरील पान


इंडियाना जोन्स अँड द डायल ऑफ डेस्टिनी हा २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला अमेरिकन थरारपट आहे. याची कथा जेझ बटरवर्थ, जॉन-हेन्री बटरवर्थ आणि डेव्हिड कोप्स यांनी लिहिली तर दिग्दर्शन जेम्स मॅनगोल्डचे होते. हा चित्रपट इंडियाना जोन्स चित्रपट शृंखलेतील पाचवा आणि अंतिम भाग आहे. यात हॅरिसन फोर्ड, जॉन ऱ्हिस-डेव्हिस आणि कॅरेन ऍलन यांनी अनुक्रमे इंडियाना जोन्स, सल्ला आणि मॅरियन रेव्हनवूड यांच्या भूमिका साकारल्या आहेत तर फीबी वॉलर-ब्रिज, अँतोनियो बांदेरास, टोबी जोन्स, बॉयड हॉलब्रुक, एथन इज हे पहिल्यांदाच या चित्रपटांमध्ये आहेत.

या चित्रपटाचे कथानक १९६९मध्ये सुरू होते. यात इंडियाना जोन्स आणि त्याची मानलेली मुलगी हेलेना हे एक शक्तिमान वस्तू शोधत असतात, ज्याच्या मागे नाझी असलेला नासाचा संशोधकही असतो.


डायल ऑफ डेस्टिनी हा या मालिकेतील एकमेव चित्रपट आहे जो स्टीव्हन स्पीलबर्गने दिग्दर्शित केलेला नाही किंवा जॉर्ज लुकासने संकल्पित केलेला नाही. दोघेही या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते होते. वॉल्ट डिस्ने स्टुडिओने लुकासफिल्म आणि भविष्यातील सिक्वेलसाठी चित्रपटाचे हक्क संपादन केल्यानंतर पॅरामाउंट पिक्चर्सद्वारे वितरित न केलेला हा मालिकेतील पहिला चित्रपट आहे. पॅरामाउंटने पहिल्या चार चित्रपटांचे वितरण हक्क आणि एक अवशिष्ट सहयोगी हक्क राखून ठेवलेले आहेत.

संदर्भ आणि नोंदी