इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन
आय.आर.सी.टी.सी.चा लोगो |
इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (इंग्लिश: Indian Railway Catering and Tourism Corporation; संक्षेप: आय.आर.सी.टी.सी.) ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. ही कंपनी रेल्वेमधील खानपान सेवा, तिकिट विक्री तसेच रेल्वेसंबंधित पर्यटन इत्यादी खाती संभाळते.
इंटरनेट वापरून भारतामधील रेल्वेच्या तिकिटांचे आरक्षण तसेच रद्दीकरण आय.आर.सी.टी.सी.द्वारे सुलभ झाले आहे. आय.आर.सी.टी.सी.च्या नव्या तंत्रामुळे मोबाईल फोन वापरून देखील तिकिट आरक्षण केले जाऊ शकते. मे २०१३ अखेरीस आय.आर.सी.टी.सी.च्या संकेतस्थळावरून दर मिनिटाला २००० तिकिटे आरक्षित केली जाऊ शकतात.
भारतीय रेल्वेच्या सर्व दुरंतो एक्सप्रेस व काही राजधानी एक्सप्रेस गाड्यांमध्ये खानपान सेवा पुरवण्याची जबाबदारी आय.आर.सी.टी.सी. वर आहे. ह्याखेरीज रेल्वेच्या पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी इत्यादी विशेष पर्यटन गाड्यांचे आरक्षण तसेच मार्केटिंग आय.आर.सी.टी.सी. करते.
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ
- ऑनलाईन तिकिट आरक्षण केंद्र Archived 2007-03-03 at the Wayback Machine.