Jump to content

इंडियन पॉप

इंडियन पॉप संगीत किंवा इंडिपॉप हे भारतातील संगीतकारांनी तयार केलेले आणि गायलेले पॉप संगीत आहे. हे भारतीय लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यावर आधारलेले असते. याशिवाय त्यामध्ये जगातील विविध भागांतील प्रसिद्ध असे संगीताचे विविधखंड असतात. भारतीय चित्रपटसृष्टीमधून भारतीय पॉप संगीताचा उदय झाला. उषा उथ्थुप, शॅरॉन प्रभाकर, पिनाझ मसानी, इ. गायकांनी हे गीतप्रकार लोकप्रिय केले. याच्यानंतर के. के, अलिशा चिनॉय, शांतनु मुखर्जी, सागरिका, बाबा सेहगल, इ. गायकानी या गीतप्रकाराला लोकप्रियता मिळवून दिली.

रिमिक्स या गीतप्रकारामध्ये जुन्या गाण्याला नव्या रूपात सादर केले जात.