Jump to content

इंटरॉगेटिंग मॉडर्निटी (पुस्तक)

इंटरॉगेटिंग मॉडर्निटी : कल्चर ॲन्ड कलोनिॲलिझम इन इंडिया[] हे १३ निबंधांचा संग्रह असलेले पुस्तक आहे. या पुस्तकात वसाहतवाद आणि सत्ता यांच्या पार्श्वभूमीवर भारतातील संस्कृती आणि आधुनिकता यांचे नाते उलगडले आहे. पहिले पाच निबंध हे दृश्य संस्कृतीशी निगडित आहेत आणि बाकीचे सांस्कृतिक व्यवहार म्हणून वाङ्मयीन साहित्याकडे बघतात.

सारांश आणि मुख्य मांडणी

संपादकाचा परिचय

संपादकाच्या मते भारतीय संस्कृतीला, संस्कृतीच्या सर्वसामान्य धारणांपासून वेगळ केले पाहिजे तसेच भिन्न व रोज जगले जाणारे म्हणून बघितले पाहिजे. समकालीन संदर्भात रोजच्या आयुष्यात भारतीय संस्कृती ही जात, वर्ग, लिंगभाव यांच्या आंतरछेदितेमधून दिसून येते. पुस्तकातील निबंधांची निवड, वासाहतिक आणि उत्तरवासाहतिक संदर्भात संस्कृती, ज्ञान आणि सत्ता यांच्या आंतरछेदावर भर देत, संपादिका भारतीय संस्कृतीच्या पौर्वात्य रचनेला आव्हान देतात.

रेव्हिलेशन ॲन्ड डाऊट: संत तुकाराम आणि देवी – गीता कपूर

गीता कपूर[] या संत तुकाराम आणि देवी या लोकप्रिय सांस्कृतिक चिन्हांना सद्यस्थितीत विद्यमान असेलेल्या (ज्या इतिहासातून उसन्या घेतलेल्या नाहीत किंवा शोधक बुद्धीने व्याप्त नाहीत) अशा 'जिवंत परंपरा’ असे मानतात.

या परंपरांत सातत्याने बदल होऊन त्यांचेव जहालीकरण होताना दिसते. गीता कपूर या चित्रपटांतील “'जिवंत परंपरेचे’” समीक्षण करतात व दावा करतात की जगण्याच्या संस्कृतीला जाणून घेतल्याने समकालीन संस्कृती समजणे सोपे जाते.

द फाळके एरा : कॉंनफ्लिक्ट ऑंफ ट्रॅडिशनल फॉर्म ॲन्ड मॉर्डन टेक्नॉलॉजी - आशिष राज्याध्यक्ष

भारतीय चित्रपटांचा उगम आणि त्यासोबतच भारतीय भांडवल आणि उद्योग यांचा विकास यांची चिकित्सा करताना लेखक असे नमूद करतात की भारतीय सिनेमातील प्रतिमांची यशस्वी मध्यस्थी ही आधुनिकतेतली मध्यस्थी आहे.

आपले काय आहे या प्रश्नासाठी इतिहासाकडे वळणे क्रमप्राप्त आहे; कारण चित्रपटांत एकही भांडवलविरोधी किंवा वसाहतवाद विरोधी प्रतिक्रिया दिसत नाही. याउलट जे आहेत ते बदल, परिस्थिती व प्रेरणांची एक शृंखला आहे.

वूमन, नेशन ॲन्ड द कंटेम्परी हिंदी सिनेमा - सोमनाथ झुत्शी

विसाव्या शतकातली हिंदी चित्रपटातली जास्त लोकप्रिय प्रतिमा म्हणजे स्त्रिया, राष्ट्र आणि बाहेरचे, राष्ट्रवाद्यांच्या कामामधले निर्माण झालेले आणि पुनर्निर्मित स्त्री प्रश्नांनी झपाटलेले राष्ट्रवादी विचार होय. राष्ट्राचे नियंत्रण(शरीराचे राजकारण) हे स्त्रीच्या (स्त्रीच्या शरीराच्या) नियंत्रणाशी जोडले गेले तर भारतीय स्त्रीला बाहेरची /इतर(मुख्यत: भारतीय मुस्लिम स्त्री) असे रचले गेले, जिच्यापासून देश वाचवला पाहिजे. स्त्रियांची अशी प्रतिमा ही साजेसी बनवलेल्या भारतीय इतिहासातून घेतली गेली असे ही त्या सांगतात.

द व्ह्यूअर्स व्ह्यू : लुकिंग ॲट पिक्चर्स - गुलाम महम्मद शेख

शेख पारंपरिक कलेच्या गुण-दोष विवेचनाच्या चौकटीत राहून भारतीय आणि युरोपियन चित्रांची तुलना करून आपले काय आहे हे शोधण्याचा प्रयत्‍न करतात. चित्रांची जागा, भेदावर आधारलेला शारीरिक परिप्रेक्ष, प्रेक्षकांचे विविध नात्याचे अनुभव आणि एकटक पाहण्याची प्रवाहिता या चिकित्सेमधून कथांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे याचे घटक ते वेगळे करतात.

इमॅजिंग ट्रूथ ॲन्ड डिझायर : फोटोग्राफी ॲन्ड द व्हिज्युअल फील्ड इन इंडिया – आर. श्रीवात्सन

लेखकाच्या मते सत्याच्या कल्पनेमधून, आपल्या इच्छा आणि (स्वतः) मुळात सत्य काय आहे याची संकल्पना रचताना, आधुनिक जगामध्ये निओ साम्राज्यवाद, कम्युनिझम, पुरुषसत्तेची पुनर्रचना, अधीनतेचे सूक्ष्म राजकारण यांचे लोकांच्या दृश्य अवकाशावर वर्चस्व असते. शक्तिशाली चिन्हांची उभारणी करताना आणि अधिसत्तेच्या उपकरणांची कल्पना करताना प्रेक्षकांनी टीका (समीक्षण) आणि आव्हान करणे गरजेचे आहे.

एम्पायर, नेशन ॲन्ड द लिटररी टेक्स्ट – सुसी थारू ॲन्ड के. ललिता

या दोन लेखिका १८व्या शतकातले ‘राधिका संतवानम’ (कृतार्थ राधिका) हे तेलुगू पुस्तक प्रकाश झोतात येण्यामागे वसाहतवाद व राष्ट्रवादातील साम्याचे परीक्षण करतात. मध्ययुगात जे कलाकारांचे बंड झाले त्याला प्रेरित होऊन गणिका मुद्द्पलानी (जिला वरच्या जातीमधील महिलांप्रमाणे बंधने नव्हती) हिने राधा आणि कृष्ण यांच्या पारंपरिक चित्रीकरणाला उलथून पाडले. तिने केलेल्या स्त्रीच्या लैंगिकता आणि इंद्रिय सुखाच्या परखड चिकित्सेची कल्पना आजही करायला अवघड आहे. तसेच त्या चिकित्सेमुळे राष्ट्रवादाच्या विचारप्रवाहातील सांस्कृतिक निवड, शोषण, नैतिकतेचे संरक्षण व लिंगभाव, वर्ग व जातीचे वर्चस्व समजून घेण्यास मदत होते.

इन्व्हेस्टिंग मॉडर्निटी : द इमर्जन्स ऑफ द नॉव्हेल इन इंडिया - शिवाराम पडिक्कल

लेखक येथे १९व्या शतकात ‘कादंबरी’ या साहित्य प्रकाराच्या भारतीय स्वरूपात झालेल्या उदयाची चिकित्सा करतात. साहित्याची निर्मिती ही प्रस्थापितांसाठी स्वतःचे वास्तव आणि इतिहास रचण्याचे एक साधन असते, असे या चिकित्सेच्या आधारावर लेखक मांडतात.

भारतात कादंबरी हा साहित्य प्रकार संस्कृतमधील बाणभट्टाच्या ’कादंबरी’वरून आला. जगातील ही बहुधा जगातली पहिलीच कादंबरी असावी. मात्र आधुनिक कादंबरी भारतात पाश्चिमात्य साहित्यावरून आली. ह्या पाश्चिमात्य साहित्यप्रकाराचा स्वीकार हा एक 'गुंतागुंतीचे ऐतिहासिक व्यवहार होता. आधुनिक भारतीय कादंबरीने पाश्चिमात्य कादंबरीशी स्पर्धा न करता एक नवीन प्रकार निर्माण केला. या माध्यमातून भारतीय मध्यम वर्गाने आधुनिकतेची कल्पना केली आणि वसाहतविरोधी प्रतिक्रिया रचली (कन्नड कादंबरी).

द पॉलिटिक्स ऑफ द पॉसिबल – कुमकुम संगारी

कुमकुम संगारी या कशातले तरी भिन्नत्व स्पष्ट करतात (कशातले?) आणि युरो-अमेरिकन उत्तर आधुनिकतावादामध्ये ग्ब्रीयल गार्सिया मार्क्वेझ आणि सलमान रश्दी यांच्या कामाच्या (अद्भुत वास्तवतावाद) सहज एकरूपतेच्या राजकारणाविषयी प्रश्न विचारतात.

द फीमेल सबजेक्ट, द कलोनिअल गेज : रीडिंग आयविटनेस अकाउन्ट्‌स ऑफ विडो बर्निंग – लता मणी

लता मणी या स्त्रीवादी दृष्टीकोनातून सतीच्या प्रत्यक्षदर्शीच्या राजकारणाविषयी परिक्षण करतात. हिंदू धर्माने सतीला मान्यता दिली आहे यांच्या आधारावर सतीचा कायदा झाल्यानंतरहि ब्रिटिशांनीही सतीला मान्यता दिली. किमान असलेले आणि खूप शोधलेले कार्यालयीन कागदपत्र यावरून स्रीची व्यक्तीनिष्ठता आणि तिच्या कृती करण्यामागचा तर्क समजतो.चर्चाविश्व सतीचे नायिका किंवा जिच्या अनियमित व्यक्तीनिष्ठतेला पायबंद घातला आहे अशी करुण बळी असे ध्रुवीकरण करते. स्त्रीची शोषित म्हणून जे स्थानिकरण आहे ती फक्त वसाहतिक काळातच नव्ह्ती तर राष्ट्रवादी आणि पाश्चिमात्य स्त्रीवाद्याच्या वेळीहि होती.

द सब्जेक्ट ऑफ सती - राजेश्वरी सुंदर राजन

राजन या कायद्यापासून ते चित्रपटापर्यंत, बऱ्याचशा तात्कालिक चर्चाविश्वातल्या सतीच्या प्रतिनिधित्वाचे परीक्षण करतात. त्याच्या मते हे प्रतिनिधित्व बहुतेक वेळा परंपरा विरुद्ध आधुनिकता या द्वैतावर अवलंबून असते. त्या म्हणतात कि वादाचे द्वैतीकरण हे स्वतःच समस्यात्म्क आहे. तसेच भारतातील सती प्रथेच्या व्यक्तीनिष्ठीकारणाची प्रक्रिया व 'प्रतिनिधित्वाचे राजकारण' हे कसे एकमेकांना छेदतात हे ही त्या दाखवण्याचा प्रयत्न करतात.

कलोनिॲलिझम ॲन्ड द ॲस्थेटिक्स आफ ट्रान्सलेशन - तेजस्विनी निरंजन

तेजस्विनीच्या [] मते वासाहतिक संदर्भात भाषांतर हे विशेषाधिकार असून त्याला प्रतीनिधित्वापासून वेगळे करता येणार नाही. भाषांतर हे पौर्वात्यांचे व इतरांचे पुनर्रचना करतो व विषम सत्ता संबंध टिकवून ठेवतो. त्या भाषांतराच्या नवीन व्यवहारची गरज मांडतात जे तात्त्विक, तात्पुरते व मध्यस्थी करणारे असतील.

कलोनिॲलिझम ॲन्ड द व्होकॅब्युलरीज ऑफ डॉमिनन्स - पी. सुधीर

अधिसत्ता मिळवण्यासाठी व विस्तारण्यासाठी वासाहतिक भाषांवरील नियंत्रणाचा उपयोग कसा होता याबाबत पी. सुधीर या लेखामध्ये मांडणी करतात. हे खास करून ग्रंथांच्या नियमांकनाद्वारे व प्रमाणीकरणाद्वारे, तसेच शब्दसंग्रह-द्विभाषिक शब्दकोश बनवून केले गेले. लेखक आधुनिक तेलुगूबाबत ही प्रक्रिया दाखवून देतात आणि वासाहतिक तंत्रज्ञानात्मक विकासामुळे भाषांच्या उत्क्रांतीची प्रक्रिया अधोरेखित करतात.

द डिस्कोर्स ऑन सायंटिफिक रॅशनॅलिटी : अ स्टडी ऑफ मास्टर रामचंद्र - एस. इरफान हबीब व ध्रुव रायना

पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात लेखक वासाहतिक काळातील विज्ञानाचे तसेच पाश्चिमात्य विवेकनिष्ठतेला भारताला साजेस्या ्रूपात आणण्याच्या प्रक्रियेचे परीक्षण करतात. यासाठी लेखक मास्टर रामचंद्रचे उदाहरण घेतात. या रामचंद्रांनी १९व्या शतकात वैज्ञानिक ज्ञान देशी भाषांमध्ये आणण्याची मागणी केली. त्यांची ही मागणी निव्वळ राजकीय होती. ते विज्ञान हे वासाहतिक समुदायांची मुक्ती आहे असे मानतात. त्यांचावर पाश्चिमात्य तंत्रज्ञान व विज्ञानाचा एवढा प्रभाव होता की त्यांनी पाश्चिमात्यांशी एकरूप होण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.

संदर्भ सूची'

  1. ^ Niranjana, Tejaswini; Sudhir, P.; Dhareshwar, Vivek (1993). Interrogating Modernity: Culture and Colonialism in India (इंग्रजी भाषेत). Seagull. ISBN 9788170461098.
  2. ^ Cotter, Holland (2007). "The Feminist Future: Theory and Practice in the Visual Arts - Symposium - Report". The New York Times (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. 2018-03-23 रोजी पाहिले.
  3. ^ "Tejaswini Niranjana — Centre for the Study of Culture and Society". cscs.res.in (इंग्रजी भाषेत). 2018-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-23 रोजी पाहिले.