Jump to content

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९१-९२
ऑस्ट्रेलिया महिला
इंग्लंड महिला
तारीख१९ – २३ फेब्रुवारी १९९२
संघनायकलीन लार्सेन हेलेन प्लीमर
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाडेनिस ॲनेट्स (१४८) वेंडी वॉट्सन (६४)
सर्वाधिक बळीइसाबेल साकिरीस (७)
चर्मिन मेसन (७)
कॅरॉल हॉज (२)

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९९२ दरम्यान एक महिला कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. एकमेव कसोटी महिला ॲशेस अंतर्गत खेळविण्यात आली. इंग्लंडने नुकतेच न्यू झीलंड महिलांना तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने हरवले होते. त्यानंतर न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलियाबरोबर महिला एकदिवसीय तिरंगी मालिकेत देखील भाग घेतला होता. तिरंगी मालिकेत इंग्लंड महिलांनी उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. परंतु अंतिम सामन्यात आलेल्या पावसामुळे सामना रद्द करावा लागला होता आणि गट फेरीत ऑस्ट्रेलिया महिला अव्वल राहिल्याने त्यांना विजेते घोषित करण्यात आले.

एकमेव महिला कसोटी सामना नॉर्थ सिडनी ओव्हलवर खेळविण्यात आला. इंग्लंड महिलांनी कसोटीत खराब खेळी केली. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची डेनिस ॲनेट्स हिच्या नाबाद १४८ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियन महिलांनी कसोटी सामना १ डाव आणि ८५ धावांनी जिंकत महिला ॲशेस चषक राखला.

महिला कसोटी मालिका

एकमेव महिला कसोटी

१९-२३ फेब्रुवारी १९९२
महिला ॲशेस
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि
१४६ (१०३.५ षटके)
वेंडी वॉट्सन ३५ (१५९)
इसाबेल साकिरीस ४/२७ (२७ षटके)
३४६/४घो (१५० षटके)
डेनिस ॲनेट्स १४८* (३७५)
कॅरॉल हॉज २/६५ (३८ षटके)
११५ (१०२.२ षटके)
वेंडी वॉट्सन २९ (११५)
इसाबेल साकिरीस ३/१८ (२३ षटके)
ऑस्ट्रेलिया महिला १ डाव आणि ८५ धावांनी विजयी.
नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनी