Jump to content

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९३४-३५

इंग्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ १९३४ च्या मोसमात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडच्या दौऱ्यावर गेला होता. याच दौऱ्यात २८ डिसेंबर १९३४ रोजी ब्रिस्बेन येथे इंग्लंड महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला या संघांमध्ये जगातील पहिला महिला कसोटी सामना खेळविला गेला. इंग्लंड महिलांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध महिला ॲशेसअंतर्गत ३ महिला कसोटी सामने खेळले तर नंतर न्यू झीलंडविरुद्ध एक महिला कसोटी सामना खेळवला गेला.

महिला ॲशेस

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९३४-३५
ऑस्ट्रेलिया महिला
इंग्लंड महिला
तारीख२८ डिसेंबर १९३४ – २० जानेवारी १९३५
संघनायकमार्गरेट पेडेनबेटी आर्चडेल
कसोटी मालिका
निकालइंग्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली

इंग्लंड महिलांनी ३ सामन्यांची महिला ॲशेस मालिका २-० अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व मार्गरेट पेडेन हिने तर बेटी आर्चडेलकडे इंग्लंडचे कर्णधारपद सोपविण्यात आले. प्रथम महिला कसोटी सामन्यासाठी तत्कालिन ५ पाच कसोटी देशांच्या पुरूष संघाचे कर्णधार हजर होते. ऑस्ट्रेलियाच्या पुरूष संघाचे कर्णधार बिल वूडफुल, न्यू झीलंडचे कर्ली पेज, इंग्लंडचे बॉब वायट, वेस्ट इंडीजचे जॅकी ग्रांट, दक्षिण आफ्रिकेचे जॉक कॅमेरॉन आणि भारताचे कर्णधार सी.के. नायडू ह्या सर्वांनी महिला खेळाडूंचे क्रिकेट विश्वात स्वागत करत सामन्याला उपस्थित राहिले.

महिला कसोटी मालिका

१ली महिला कसोटी

२८-३१ डिसेंबर १९३४
महिला ॲशेस
धावफलक
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
४७ (४९.३ षटके)
कॅथ स्मिथ २५
मर्टल मॅकलॅगन ७/१० (१७ षटके)
१५४ (७३.२ षटके)
मर्टल मॅकलॅगन ७२
ॲनी पाल्मर ७/१८ (१३.२ षटके)
१३८ (१२५.३ षटके)
एसी शेव्हिल ६३*
मेरी स्पीयर ५/१५ (३४ षटके)
३४/१ (१२.५ षटके)
बेटी स्नोबॉल १८*
पेगी अँटोनियो १/२० (४.५ षटके)
इंग्लंड महिला ९ गडी राखून विजयी.
ब्रिस्बेन शोग्राउंड, ब्रिस्बेन

२री महिला कसोटी

४-८ जानेवारी १९३५
महिला ॲशेस
धावफलक
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६२ (१२१.२ षटके)
कॅथ स्मिथ ४७
मर्टल मॅकलॅगन ४/३३ (३३.२ षटके)
३०१/५घो (८७ षटके)
मर्टल मॅकलॅगन ११९
कॅथ स्मिथ ३/४२ (२० षटके)
१४८ (८०.४ षटके)
एसी शेव्हिल ३६
जॉय पार्टरिज ६/९६ (३५.४ षटके)
१०/२ (६ षटके)
बेटी स्नोबॉल*
एसी शेव्हिल १/२ (१ षटक)
इंग्लंड महिला ८ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी

३री महिला कसोटी

१८-२० जानेवारी १९३५
महिला ॲशेस
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
वि
१६२ (७१.५ षटके)
मर्टल मॅकलॅगन ५०
पेगी अँटोनियो ६/४९ (२१.५ षटके)
१५० (१२९.१ षटके)
ॲनी पाल्मर ३९
मेरी स्पीयर ३/२१ (३१ षटके)
१५३/७घो (५७ षटके)
बेटी स्नोबॉल ८३*
ॲनी पाल्मर ३/१७ (७ षटके)
१०४/८ (५७ षटके)
जॉईस ब्रीवर ३१
मर्टल मॅकलॅगन ४/२८ (२४ षटके)

इंग्लंड महिला वि न्यू झीलंड महिला

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, १९३४-३५
न्यू झीलंड महिला
इंग्लंड महिला
तारीख१६ – १८ फेब्रुवारी १९३५
संघनायकरुथ सायमन्सबेटी आर्चडेल
कसोटी मालिका
निकालइंग्लंड महिला संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

महिला ॲशेस संपताच इंग्लंड संघाने शेजारील देश न्यू झीलंडकडे प्रस्थान केले. तेथे इंग्लंडने न्यू झीलंड महिलांसोबत एक महिला कसोटी खेळली. रुथ सायमन्सने न्यू झीलंडचे कसोटीत नेतृत्व केले. न्यू झीलंड संघाने महिला कसोटी पदार्पण केले. इंग्लंड महिलांनी सामन्यावर प्रभुत्व गाजवत कसोटी १ डाव आणि ३३७ धावांनी जिंकली. परतीच्या प्रवासात इंग्लंड संघाने अमेरिका, कॅनडा मध्ये थांबत स्थानिक महिला संघांशी १५ तीन-तीन दिवसांचे सामने खेळले.

महिला कसोटी मालिका

एकमेव महिला कसोटी

१६-१८ फेब्रुवारी १९३५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
४४ (२८.२ षटके)
मर्ली हॉलिस २४
मर्टल मॅकलॅगन ५/२२ (१४.२ षटके)
५०३/५घो (१२८ षटके)
बेटी स्नोबॉल १८९
रुथ सायमन्स २/७१ (२० षटके)
१२२ (६२.२ षटके)
मार्ज बिशप २७
जॉय पार्टरिज ४/६० (२२ षटके)
इंग्लंड महिला १ डाव आणि ३३७ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च