इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत, पाकिस्तान आणि सिलोन दौरा, १९६१-६२
इसवी सन १९६१ ते १९६२ दरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाने भारत, सिलोन आणि पाकिस्तानचा दौरा केला. इंग्लंडने भारतात ५ कसोटी सामने खेळले. पाकिस्तानविरुद्ध ३ कसोटी सामने खेळवले गेले. इंग्लंडने पाकिस्तानचा कसोटी खेळण्याकरता पहिल्यांदाच दौरा केला. तसेच इंग्लंडने सिलोनविरुद्ध एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.
भारत वि इंग्लंड
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९६१-६२ | |||||
भारत | इंग्लंड | ||||
तारीख | ११ नोव्हेंबर १९६१ – १५ जानेवारी १९६२ | ||||
संघनायक | नरी काँट्रॅक्टर | टेड डेक्स्टर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | विजय मांजरेकर (५५६) | केन बॅरिंग्टन (५९४) | |||
सर्वाधिक बळी | सलीम दुराणी (२३) | टोनी लॉक (२२) |
ऑक्टोबर १९६१ मध्ये पाकिस्तानशी एक कसोटी सामना खेळून झाल्यावर इंग्लंड क्रिकेट संघ नोव्हेंबर १९६१ मध्ये भारतात आला. भारतात स्थानिक संघांशी प्रथम-श्रेणी सराव सामन्यांसोबतच भारतीय क्रिकेट संघाबरोबर इंग्लंडने नोव्हेंबर १९६१ ते जानेवारी १९६२ दरम्यान ५ कसोटी सामने खेळले. कसोटी मालिकेत भारताने २-० असा विजय संपादन केला. इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिला कसोटी मालिका विजय होता. भारताबरोबरची कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंड संघ लगेचच पाकिस्तान बरोबर उरलेले २ कसोटी खेळण्यासाठी ढाकाला रवाना झाला.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना:संयुक्त विद्यापीठे वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:पश्चिम विभाग वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:बॉम्बे वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:भारतीय राष्ट्रपती XI वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:राजस्थान वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:मध्य विभाग वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:उत्तर विभाग वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:पूर्व विभाग वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:सर्व्हिसेस वि एम.सी.सी.
तीन-दिवसीय सामना:दक्षिण विभाग वि एम.सी.सी.
भारत वि इंग्लंड कसोटी मालिका
१ली कसोटी
२री कसोटी
भारत | वि | |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- फारूख इंजिनीयर, दिलीप सरदेसाई (भा) आणि बॅरी नाइट (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
४थी कसोटी
५वी कसोटी
भारत | वि | |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- एरापल्ली प्रसन्ना (भा) याने कसोटी पदार्पण केले.
पाकिस्तान वि इंग्लंड
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६१-६२ | |||||
पाकिस्तान | इंग्लंड | ||||
तारीख | २१ ऑक्टोबर १९६१ – ७ फेब्रुवारी १९६२ | ||||
संघनायक | इम्तियाझ अहमद | टेड डेक्स्टर | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९६१ मध्ये पाकिस्तानबरोबर एक कसोटी खेळली ज्यात इंग्लंडने विजय मिळवला. त्यानंतर इंग्लंड ५ कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात गेला. तिथून जानेवारी १९६२ मध्ये राहिलेल्या २ कसोट्या खेळण्यास इंग्लंड संघ पाकिस्तानात परतला. उर्वरीत २ कसोट्या अनिर्णित सुटल्या. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.
पाकिस्तान वि इंग्लंड कसोटी मालिका
१ली कसोटी
२१-२६ ऑक्टोबर १९६१ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- पाकिस्तानी भूमीवर इंग्लंडचा पहिला कसोटी सामना.
- अफाक हुसेन (पाक), ॲलन ब्राउन, एरिक रसेल आणि बुच व्हाइट (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.