इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३
इंग्लंड क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २०२२-२३ | |||||
पाकिस्तान | इंग्लंड | ||||
तारीख | २० सप्टेंबर – २१ डिसेंबर २०२२ | ||||
संघनायक | बाबर आझम | जोस बटलर (आं.टी२०)[n १] | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | बाबर आझम (३४८) | हॅरी ब्रुक (४६८) | |||
सर्वाधिक बळी | अबरार अहमद (१७) | जॅक लीच (१५) | |||
मालिकावीर | हॅरी ब्रुक (इं) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ७-सामन्यांची मालिका ४–३ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मोहम्मद रिझवान (३१६) | हॅरी ब्रुक (२३८) | |||
सर्वाधिक बळी | हॅरीस रौफ (८) | सॅम कुरन (७) डेव्हिड विली (७) | |||
मालिकावीर | हॅरी ब्रुक |
२०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मालिका म्हणून सात आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड क्रिकेट संघ सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२२ मध्ये पाकिस्तानचा दौरा करत आहे.[१][२] इंग्लंडचा संघ डिसेंबरमध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानात परतेल.[३][४] कसोटी सामने २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग बनतील..[५][६]
नोव्हेंबर २०२१ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इसीबी)चे मुख्य कार्यकारी टॉम हॅरिसन, ऑक्टोबर २०२१ मध्ये इंग्लंडचा पाकिस्तानचा नियोजित दौरा रद्द झाल्यानंतर इसीबी आणि पीसीबी यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानला गेले.[७] सकारात्मक चर्चेनंतर, पाच टी२० सामन्यांचा मूळ दौरा सात सामन्यांचा करण्यात आला.[८] आधी टी२० सामने खेळवले जातील,[९] तर ऑस्ट्रेलियातील २०२२ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकनंतर कसोटी सामने खेळवले जातील.[१०] एप्रिल २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मालिका होणार असण्याची पुष्टी केली.[११][१२] जुलै २०२२ मध्ये, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेरमन रमीझ राजा यांनी सांगितले की टी२० सामने लाहोर आणि कराचीमध्ये होण्याची शक्यता आहे.[१३] टी२० मालिकेचे तपशील २ ऑगस्ट २०२२ रोजी निश्चित करण्यात आले.[१४][१५][१६] कसोटी मालिकेचा कार्यक्रम नंतर २२ ऑगस्ट २०२२ रोजी जाहीर करण्यात आला.[१७][१८]
टी२० मालिकेतील कराचीमधील सामन्यांत मध्ये मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती दिसली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, कराचीतील पहिल्या चार सामन्यांना १,२६,५५० लोक उपस्थित होते.[१९]
१६ डिसेंबर २०२२ रोजी, पाकिस्तानच्या अझहर अलीने कसोटी मालिका पूर्ण झाल्यानंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली.[२०]
पथके
कसोटी | आं. टी२० | ||
---|---|---|---|
पाकिस्तान | इंग्लंड | पाकिस्तान[२१] | इंग्लंड[२२] |
|
|
|
इसीबी ने जाहीर केले की जोस बटलर पोटरीला झालेल्या दुखापतीमुळे टी२० मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार आहे, त्याच्याजागी मोईन अलीकडे कर्णधारपद देण्यात आले.[२३] ॲलेक्स हेल्सला नंतर टी२०संघात समाविष्ट करण्यात आले.[२४]
आं.टी२० मालिका
१ला आं.टी२० सामना
पाकिस्तान १५८/७ (२० षटके) | वि | इंग्लंड १६०/४ (१९.२ षटके) |
मोहम्मद रिझवान 68 (46) ल्यूक वूड ३/२४ (४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- शान मसूद (पा) आणि ल्यूक वूड (इं) दोघांचे आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- मोहम्मद रिझवान (पा) हा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये कमीत कमी डावांमध्ये (५२) सर्वात वेगवान २,००० धावा करणारा चौथा पाकिस्तानी खेळाडू ठरला त्याने ह्याबाबतीत बाबर आझमशी बरोबरी केली .[२५]
२रा आं.टी२० सामना
इंग्लंड १९९/५ (२० षटके) | वि | पाकिस्तान २०३/० (१९.३ षटके) |
३रा आं.टी२० सामना
इंग्लंड २२१/३ (२० षटके) | वि | पाकिस्तान १५८/८ (२० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- विल जॅक्सचे (इं) आं.टी२० पदार्पण.
४था आं.टी२० सामना
पाकिस्तान १६६/४ (२० षटके) | वि | इंग्लंड १६३ (१९.२ षटके) |
मोहम्मद रिझवान ८८ (६७) रिस टॉपली २/३७ (४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- ओली स्टोनचे (इं) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
५वा आं.टी२० सामना
पाकिस्तान १४५ (१९ षटके) | वि | इंग्लंड १३९/७ (२० षटके) |
मोहम्मद रिझवान ६३ (४६) मार्क वूड ३/२० (४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- आमिर जमालचे (पा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण
६वा आं.टी२० सामना
पाकिस्तान १६९/६ (२० षटके) | वि | इंग्लंड १७०/२ (१४.३ षटके) |
- नाणेफेक : इंग्लड, क्षेत्ररक्षण
- मोहम्मद हॅरीसचे (पा) आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण.
- बाबर आझमची (पा) आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सर्वात कमी डावात (८१) ३,००० धावा पूर्ण करण्याच्या विराट कोहलीच्या (भारत) विक्रमाशी बरोबरी.[२८]
७वा आं.टी२० सामना
कसोटी मालिका
१ला कसोटी सामना
१–५ डिसेंबर २०२२ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे पहिल्या दिवशी १५ षटकांचा खेळ होऊ शकला नाही.
- सौद शकील, हॅरीस रौफ, मोहम्मद अली, झाहिद महमूद (पा), लियाम लिविंगस्टोन आणि विल जॅक्स (इं) या सर्वांचे कसोटी पदार्पण.
- बेन डकेट आणि हॅरी ब्रुक (इं) या दोघांचे पहिले कसोटी शतक.[२९]
- झॅक क्रॉली चे शतक हे इंग्लिश सलामीवीराचे चेंडूंच्या बाबतीत सर्वात वेगवान कसोटी शतक होते (८६).[३०]
- चार इंग्लिश खेळाडूंनी पहिल्या दिवशी शतके ठोकली, कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक शतके.[३१]
- इंग्लंडने पहिल्या दिवशी ५०६ धावा केल्या, कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी केलेल्या सर्वाधिक धावा.[३१]
- संघांच्या एकत्रित १,७६८ धावा ह्या ५ दिवसांच्या कसोटी सामन्यातील सर्वोच्च एकूण धावा होत्या, ज्याने मागील २४-२९ जानेवारी १९६९ या कालावधीत वेस्ट इंडीजच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड कसोटीमधील १,७६४ धावांचा विक्रम मागे टाकला. .[३२]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.
२रा कसोटी सामना
९–१३ डिसेंबर २०२२ धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी
- अबरार अहमदचे (पा) कसोटी पदार्पण
- पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात इंग्लंडने १८० धावा केल्या, कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात केलेल्या सर्वाधिक धावा.[३३]
- अबरार अहमद कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या सत्रात पाच बळी घेणारा पहिला पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३३] कसोटी पदार्पणात पाच बळी घेणारा तो तेरावा पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३४]
- अबरार अहमद पहिल्याच कसोटी सामन्यात दहा बळी घेणारा दुसरा पाकिस्तानी गोलंदाज ठरला.[३५]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.
३रा कसोटी सामना
१७–२१ डिसेंबर २०२२ धावफलक |
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- मोहम्मद वसीम (पा) आणि रेहान अहमद (इं.) ह्या दोघांचे कसोटी पदार्पण.
- रेहान अहमद हा १८ वर्षे आणि १२६ दिवसांच्या वयात कसोटी सामना खेळणारा इंग्लंडचा सर्वात तरुण पुरुष क्रिकेट खेळाडू ठरला.[३६]
- रेहान अहमदचे पदार्पणाच्या कसोटीत पाच बळी.[३७] १८ वर्षे आणि १२६ दिवसांच्या वयात पुरुषांच्या कसोटीत पाच बळी घेणारा सर्वात तरुण करणारा खेळाडू ठरला.[३८]
- जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुण: इंग्लंड १२, पाकिस्तान ०.
नोंदी
संदर्भ
- ^ "एसीबी २०२२ दौऱ्यासाठी वचनबद्धतेची पुष्टी करत इंग्लंड पाकिस्तानमध्ये सात आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये दोन अतिरिक्त टी२० सामने खेळणार". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पीसीबी तर्फे इंग्लंडच्या पाकिस्तान दौऱ्याच्या तपशिलांची पुष्टी". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड पुरुषांच्या पाकिस्तान दौऱ्यासाठी वेळापत्रक निश्चित". इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पुरुषांच्या भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. 2019-07-11 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "ECB आणि PCB यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी टॉम हॅरिसन पाकिस्तानमध्ये". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड २०२२ मध्ये दोन अतिरिक्त टी२० खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा करणार". एएनआय न्यूझ. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "दक्षिण आफ्रिका आणि न्यू झीलंड दौऱ्यांमुळे इंग्लंडचा २०२२-२३चा हिवाळा भरगच्च". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२ च्या पाकिस्तान दौऱ्यात इंग्लंड दोन अतिरिक्त टी२० सामने खेळणार". Dawn. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये इंग्लंड, न्यू झीलंड पाकिस्तानचा दौरा करणार". क्रिकबझ्झ. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानतर्फे राष्ट्रीय संघासाठी १२ महिने व्यस्त असल्याची घोषणा". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये लाहोर, कराची येथे इंग्लंडविरुद्ध टी२० सामने होण्याची शक्यता आहे". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कराची आणि लाहोरमध्ये इंग्लंड पाकिस्तानचा बंपर हंगाम सुरू करणार आहे". pcb.com.pk. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडच्या १७ वर्षांतील पहिल्या पाकिस्तान दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर". ICC. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कराची, लाहोर येथे आं.टी२० चे आयोजन, इंग्लंड १७ वर्षांनी पाकिस्तानात परतले". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड डिसेंबरमध्ये रावळपिंडी, मुलतान आणि कराची येथे कसोटी खेळणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "एकूण १,२६,५५० प्रेक्षकांची कराचीतील चार टी२०साठी विक्रमी ९५.३% उपस्थिती!". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले – Facebook द्वारे.
- ^ "अझहर अलीची निवृत्तीची घोषणा, इंग्लंडविरुद्धची कराची कसोटी ही त्याची शेवटची ठरणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. १७ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "२०२२ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या संघाची घोषणा". पाकिस्तान क्रिकेट बोर्ड. १५ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बेन स्टोक्स, मार्क वूड, ख्रिस वोक्स टी-२० विश्वचषकात परतले, इंग्लंडचा जुन्या रक्षकांवर विश्वास". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "टी२० विश्वचषक: इंग्लंडने जेसन रॉय ला वगळले, ख्रिस वोक्स आणि मार्क वुडला संघात". बीबीसी स्पोर्ट. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "टी२० विश्वचषक: जॉनी बेअरस्टोच्या जागी ॲलेक्स हेल्सला २०१९ नंतर प्रथमच इंग्लंडकडून बोलावणे". बीबीसी स्पोर्ट. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड: मोहम्मद रिझवान बाबर आझमशी बरोबरी करून संयुक्तपणे सर्वात जलद २००० टी२० धावा करणारा खेळाडू". इंडिया टुडे. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंडचा पाकिस्तान दौरा: बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानने पाकिस्तानला १० गडी राखून अविश्वसनीय विजय मिळवून दिला". बीबीसी स्पोर्ट. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "बाबर आझम ११०*, मोहम्मद रिझवान ८८* पाकिस्तानचा दहा गडी राखून विजय". ईएसपीएन क्रिकइन्फो. २८ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "टी२० मध्ये सर्वाधिक धावा: बाबर आझमने विराट कोहलीच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात जलद 3000 धावा करण्याच्या जागतिक विक्रमाशी बरोबरी केली". Inside Sport. ३ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "क्रॉली, डकेट, पोप, ब्रूक यांची विक्रमी शतके". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "आकडेवारी - इंग्लंड आणि त्यांच्या चार शतकवीरांनी ११२ वर्षांचा कसोटी विक्रम मोडला". ईएसपीएन क्रिकइन्फो. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी विक्रम कोसळले". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "सामन्यातील सर्वोच्च एकूण धावसंख्या". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ a b "आकडेवारी - अबरारचे विक्रमी पदार्पण आणि पाकिस्तानच्या फिरकीपटूंसाठी दुर्मिळ ऑल टेन". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ डिसेंबर २०२२. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "अबरार अहमदची कसोटी पदार्पणात ५ विकेट्स घेऊन विक्रमी नोंद". BDCricTime. ९ डिसेंबर २०२२. १० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड: रहस्यमय फिरकी गोलंदाज अबरार अहमदचे पदार्पणातच १० बळी". फर्स्टपोस्ट. १० डिसेंबर २०२२. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "कराची कसोटीसाठी नवोदित रेहान अहमदला इंग्लंडच्या अंतिम आकरामध्ये स्थान". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "फाईव्ह स्टार रेहान अहमद! फिरकीपटूचे पदार्पणातच पाच बळी!". स्काय स्पोर्ट्स. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लड वि पाकिस्तान: इंग्लंडचा रेहान अहमद पुरुषांच्या कसोटीत पाच बळी घेणारा सर्वात तरुण पदार्पण करणारा खेळाडू ठरला". स्पोर्टस्टार. २० डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.