इंगिशिकी
इंगिशिकी (延喜式 , "इंगी कालावधीतील प्रक्रिया") हे कायदे आणि रूढींबद्दलचे एक जपानी पुस्तक आहे. याच्या लेखनाचा मुख्य भाग ९२७ मध्ये पूर्ण झाला होता.[१]
इतिहास
स.न. ९०५ मध्ये, सम्राट डायगोने इंगिशिकीचे संकलन करण्याचे आदेश दिले. अशा प्रकारचे पुस्तक बनवण्याचे प्रयत्न या आधी झाल्याचे ज्ञात आहे. कोनीन किंवा जोगन गिशिकी [२] या जपानी ऐतिहासिक आणि धार्मिक अभ्यासासाठी असलेले ग्रंथ इंगिशिकीला महत्त्व देत नाहीत.[३]
फुजीवाडानो टोकीहिरा यांनी कार्य सुरू केले, परंतु चार वर्षांनंतर ९०९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला तेव्हा ते काम रखडले. त्यांचा भाऊ फुजिवारा न ताडाहिरा यांनी ९१२ मध्ये हे काम हाती घेतले आणि अखेर९२७ मध्ये पूर्ण केले.[१]
यातील अनेक पुनरावृत्तीनंतर, हे काम ९६७ पासून सुरू होणाऱ्या सुधारणेचा आधार म्हणून वापरले गेले. [ <span title="This claim needs references to reliable sources. (February 2013)">उद्धरण आवश्यक</span> ]
सामग्री
यातील मजकूर ५० वेगवेगळ्या खंडांत विभागलेला आहे आणि हे खंड विविध विभागात विभाजलेले आहेत.
- खंड १ ते १०: हा विभाग उपासनेबद्दल आहे. यात समारंभांचे नियमन आणि उपासनाबद्दलचे नियम आहेत. यात सर्व २,८६१ सूचीबद्ध शिंटे मंदीरे आणि ३.१३१ अधिकृतपणे मान्य असलेल्या प्रार्थना आहेत.[४] स,न, १९७० मध्ये फेलिसिया ग्रिसिट बॉकने इंग्रजी भाषांतर प्रकाशित केला
- खंड ११ ते ४० : राज्य व आठ मंत्रालये
- खंड –४१ ते ४९ : इतर विभाग
- खंड ५० : इतर कायदे
हे सुद्धा पहा
- जपानी ऐतिहासिक मजकूर उपक्रम
संदर्भ
- ^ a b Nussbaum, Louis-Frédéric. (2005). "Engi-shiki" in Japan Encyclopedia, p. 178.
- ^ "Jogan Gishiki" in Stuart D. B. Pecken, ed., Historical Dictionary of Shinto. Second edition. (Lanham, MD, USA: Scarecrow Press, Inc., 2011) p. 139.
- ^ " Engishiki" in Stuart D. B. Pecken, ed., Historical Dictionary of Shinto. Second edition. (Lanham, MD, USA: Scarecrow Press, Inv, 2011) p. 92.
- ^ " Engishiki" in Stuart D. B. Pecken, ed., Historical Dictionary of Shinto. Second edition. (Lanham, MD, USA: Scarecrow Press, Inc., 2011) p. 92.
पुढील वाचन
- Kubota, Jun (2007) इवानमी निहों कोटेन बुंगकू जितेन (जपानी भाषेत). इवानमी शोटेन . आयएसबीएन Kubota, Jun Kubota, Jun
बाह्य दुवे
- जपानी ऐतिहासिक मजकूर पुढाकारात जपानी मजकूर आणि इंग्रजी अनुवाद
- हस्तलिखित स्कॅन, वासेडा युनिव्हर्सिटी लायब्ररी : खंड 1-50 आणि 8-10