इ.स. २००२
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९८० चे - १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे |
वर्षे: | १९९९ - २००० - २००१ - २००२ - २००३ - २००४ - २००५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
- जानेवारी १३ - घशात प्रेत्झेल अडकून अमेरिकन अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश बेशुद्ध.
- जानेवारी १६ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने एकमताने ओसामा बिन लादेन व ईतर तालिबान विरुद्ध ठराव संमत केला.
- जानेवारी १७ - कॉॅंगोमधील माउंट न्यिरागोन्गो या ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००,००० बेघर.
- फेब्रुवारी ८ - सॉल्ट लेक सिटीतएकोणिसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी २२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार.
- फेब्रुवारी २७ - लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाइट २९६ला आग.
- फेब्रुवारी २७ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा प्रतिसाद म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,०००हून अधिक व्यक्तिंनी प्राण गमावले.
- एप्रिल ११ - ट्युनिसीयात अल कायदाकडून बॉम्बहल्ला. २१ ठार.
- एप्रिल ११ - व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष ह्युगो चावेझविरुद्ध फसलेला उठाव सुरू.
- एप्रिल १२ - व्हेनेझुएलात पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.
- एप्रिल १३ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझ विरुद्धचा उठाव फसला.
- एप्रिल १७ - अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या एफ.१६ विमानांच्या बॉम्बहल्ल्यात ४ केनेडियन सैनिक ठार.
- एप्रिल २६ - जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलीस अधिकाऱ्याला ठार मारले.
- मे ४ - नायजेरियाच्या ई.ए.एस. एरलाइन्सचे बी.ए.सी.१-११-५०० प्रकारचे विमान कानोहून निघाल्यावर कोसळले. १४८ ठार.
- मे ९ - रशियातील कास्पिस्क शहरात बॉम्बस्फोट. ४३ ठार, १३० जखमी.
- मे १० - घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना चेंगराचेंगरी. १२० ठार.
- मे १४ - तीन काश्मीरी दहशतवाद्यांचा जम्मूजवळील कालूचक येथील लष्करी छावणीवर आत्मघातकी हल्ला. ३१ ठार तर ४८ जखमी.
- मे २५ - चायना एरलाइन्स फ्लाइट ६११ हे बोईंग ७४७ जातीचे विमान तैवानच्या सामुद्रधुनीत कोसळले. २२५ ठार.
- मे २५ - मोझाम्बिकच्या तेंगा शहराजवळ रेल्वे गाडीला अपघात १९७ ठार.
- जून २२ - ईराणमध्ये भूकंप. २६१ ठार.
- जून ३० - ब्राझिलने फुटबॉल विश्वकप जिंकला.
जुलै-डिसेंबर
- जुलै २० - पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
- जुलै २१ - अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.
- जुलै २४ - आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- जुलै २७ - युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.
- डिसेंबर १३ - सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हीया, लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना यूरोपीय संघात मे १, इ.स. २००५ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.
जन्म
मृत्यू
- जानेवारी ३ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती.
- जानेवारी ३ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
- एप्रिल १८ - थॉर हायरडाल, नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ.
- मे १ - पंडित आवळीकर (मराठी वाङ्मयाचे अभ्यासक)
- मे ३ - एम. एस. ओबेरॉय, (भारतीय उद्योगपती.
- मे १९ - जॉन गॉर्टन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान.
- मे ३१ - सुभाष गुप्ते, भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे.
- जून ६ - शांता शेळके, मराठी कवियत्री.
- जून ७ - बी. डी. जत्ती, भारतीय उपराष्ट्रपती.
- जुलै ६ - धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.
- जुलै १४ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.
- जुलै २१ - गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.
- जुलै २७ - कृष्णकांत, भारताचे उपराष्ट्रपती.
- जुलै २७ - सुधीर फडके, मराठी संगीतकार, गायक.
- ऑगस्ट १६ - अबु निदाल, पॅलेस्टाईनचा नेता.
- सप्टेंबर १८ - शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
- सप्टेंबर १९ - प्रिया तेंडुलकर, मराठी अभिनेत्री.
- सप्टेंबर २६ - राम फाटक, मराठी संगीतकार, गायक.