इ.स. १९७९
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९७६ - १९७७ - १९७८ - १९७९ - १९८० - १९८१ - १९८२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
- जानेवारी १६ - ईराणच्या शहाने कुटुंबासहित ईजिप्तला पळ काढला.
- जानेवारी ३० - टोक्योहून निघालेले व्हारिग एरलाइन्सचे ७०७-३२३सी जातीचे विमान नाहीसे झाले.
- फेब्रुवारी १ - रुहोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला.
- फेब्रुवारी ७ - प्लुटो नेपच्युन पेक्षा सूर्याच्या जवळ.
- फेब्रुवारी ८ - डेनिस सास्सू-न्ग्वेस्सो कॉॅंगोच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- फेब्रुवारी ११ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- फेब्रुवारी १७ - चीन व व्हियेतनाममध्ये युद्ध सुरू.
- फेब्रुवारी २२ - सेंट लुशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- एप्रिल ११ - युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन पदच्युत.
- मे ४ - मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- मे १० - मायक्रोनेशिया प्रजासत्ताक झाले.
- मे २५ - अमेरिकन एरलाइन्स फ्लाइट १९१ हे डी.सी.१० जातीचे विमान शिकागोच्या ओहेर विमानतळावरून निघाल्यावर कोसळले. जमीनीवरील दोघांसह २७३ ठार.
- जून २६ - मुष्टियोद्धा मुहम्मद अलीने निवृत्ती घेतली.
जुलै-डिसेंबर
- जुलै ११ - अमेरिकेचे अंतराळस्थानक स्कायलॅब पृथ्वीवर कोसळले.
- जुलै १२ - किरिबाटीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- जुलै १७ - निकाराग्वाच्या राष्ट्राध्यक्ष जनरल अनास्तासियो सोमोझा देबेलने मायामी येथे पलायन केले.
- जुलै १९ - निकाराग्वात उठाव.
- जुलै २० - डायना न्याड बहामा ते फ्लोरिडा हे ६० मैलांचे अंतर पोहून गेली.
- ऑगस्ट १७ - एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.
- डिसेंबर २१ - ऱ्होडेशियाच्या स्वातंत्र्यासाठीच्या ठरावाचा मसुदा लंडनमध्ये ठरला.
- डिसेंबर २३ - सोवियेत सैन्याने अफगाणिस्तानची राजधानी काबुल काबीज केले.
- डिसेंबर २७ - अफगाणिस्तानमध्ये सोवियेत संघराज्याने बब्रक कर्मालला राष्ट्राध्यक्षपदी बसविले.
जन्म
- ऑगस्ट १० - दिनुशा फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २१ - क्रिस गेल, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- फेब्रुवारी ९ - राजा परांजपे, मराठी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.
- फेब्रुवारी २८ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.
- ऑगस्ट १६ - जॉन डीफेनबेकर, कॅनडाचा तेरावा पंतप्रधान.
- ऑगस्ट ३१ - ई.जे. स्मिथ इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - रोम्युलो बेटानकोर्ट, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑक्टोबर ६ - दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
- डिसेंबर २२ - नरहर रघुनाथ फाटक, भारतीय इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक.