इ.स. १९३६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९३३ - १९३४ - १९३५ - १९३६ - १९३७ - १९३८ - १९३९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी ६ - जर्मनीत गार्मिश-पार्टेनकर्केन येथे चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- मार्च १ - हूवर धरणाचे बांधकाम समाप्त.
- मार्च ७ - दुसरे महायुद्ध - व्हर्सायचा तह धुडकावुन जर्मनीने ऱ्हाइनलॅंडमध्ये सैन्य पाठवले.
- एप्रिल १९ - पॅलेस्टाईनमध्ये उठाव.
- मे ५ - इटलीचे सैन्य इथियोपियाची राजधानी अदिस अबाबात शिरले.
- मे ९ - इटलीने इथियोपिया बळकावले.
- मे २२ - आयर्लंडची राष्ट्रीय एरलाईन एर लिंगसची स्थापना.
- जून २८ - चीनच्या उत्तर भागात जपान आधिपत्याखालील मेंगजियांगचे राष्ट्र अस्तित्वात आले.
- जून ३० - गॉन विथ द विंड ही कादंबरी प्रकाशित.
- जुलै १७ - स्पॅनिश गृहयुद्धाला तोंड फुटले.
- जुलै २६ - जर्मनी व इतर मित्र देशांचा स्पॅनिश गृहयुद्धात हस्तक्षेप.
- ऑगस्ट १ - बर्लिनमध्ये १९३६ उन्हाळी ऑलिंपिक सुरू.
जन्म
- मार्च ११ - ऍन्टोनिन स्कॅलिया, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे १०५वे मुख्य न्यायाधिश.
- एप्रिल १९ - विल्फ्रीड मार्टेन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.
- एप्रिल २१ - जेम्स डॉब्सन, ख्रिस्ती धर्मप्रसारक.
- मे २५ - रुसी सुरती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून ८ - केनीथ गेडीज विल्सन,अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- जुलै २८ - सर गारफील्ड सोबर्स, वेस्ट इंडियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २९ - जॉन मेककेन, अमेरिकन राजकारणी.
- सप्टेंबर ७ - बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार.
- सप्टेंबर २९ - सिल्व्हियो बेर्लुस्कोनी, इटलीचा पंतप्रधान.
- ऑक्टोबर ४ - डेव्हिड पिथी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - वाक्लाव हावेल, चेक प्रजासत्ताकचा नाटककार व राष्ट्राध्यक्ष.
मृत्यू
- एप्रिल १७ - चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- जुलै २१ - जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.