इ.स. १९२५
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे |
वर्षे: | १९२२ - १९२३ - १९२४ - १९२५ - १९२६ - १९२७ - १९२८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी २ - कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली.
- एप्रिल २६ - पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- मे ५ - दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकान्स भाषेला राजभाषेचा दर्जा.
- मे ५ - अमेरिकेच्या टेनेसी राज्यातील डेटन गावातील शाळेत डार्विनचा उत्क्रांतिवाद शिकवल्याबद्दल जॉन स्कोप्स या शिक्षकाला अटक करण्यात आली.
- जून ६ - वॉल्टर पर्सी क्राइस्लरने क्राइस्लर कॉर्पोरेशनची स्थापना केली.
- जुलै १० - तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना.
- जुलै १० - उत्क्रांतीवाद शिकवल्या बद्दल अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात जॉन टी. स्कोप्स या शिक्षकावर खटला भरण्यात आला.
- जुलै १४ - जर्मनीत नाझी पक्षाव्यतिरिक्त सगळ्या राजकीय पक्षांवर बंदी.
- जुलै १८ - ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
- जुलै २१ - अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड.
- जुलै २५ - सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना.
जन्म
- जानेवारी १७ - अब्दुल कारदार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- एप्रिल १४ - एबेल मुझोरेवा, झिम्बाब्वेचा झिम्बाब्वेचा पंतप्रधान.
- मे ८ - अली हसन म्विन्यी, टांझानियाचा राष्ट्राध्यक्ष.
- मे १२ - योगी बेरा, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- मे १९ - पॉल पॉट, कंबोडियाचा हुकुमशहा.
- जून ८ - बार्बरा बुश, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुशची आई.
- जुलै १० - मुहातिर मुहम्मद, मलेशियाचा चौथा पंतप्रधान.
- जुलै १५ - फिल कॅरे, अभिनेता.
- जुलै २९ - शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
- ऑगस्ट ७ - एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ.
- ऑगस्ट ८ - अलिजा इझेत्बेगोव्हिक, बॉस्निया-हर्झगोव्हेनाचा राष्ट्राध्यक्ष.
- ऑगस्ट १४ - जयवंत दळवी, मराठी लेखक, नाटककार.
- ऑगस्ट २७ - नारायण धारप, मराठी लेखक.
- सप्टेंबर २८ - सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
मृत्यू
- फेब्रुवारी २४ - ह्यालमार ब्रॅंटिंग, स्वीडनचा पंतप्रधान.
- ऑगस्ट ३ - विल्यम ब्रुस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.