इ.स. १८९६
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे |
वर्षे: | १८९३ - १८९४ - १८९५ - १८९६ - १८९७ - १८९८ - १८९९ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ४ - युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले.
- मार्च १ - अडोवाची लढाई - इथियोपियाच्या सैन्याने इटलीला हरवले.
- मार्च १ - आंत्वान हेन्री बेकरेलने किरणोत्सर्गाचा शोध लावला.
- मे ८ - इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत यॉर्कशायरने वॉरविकशायर विरुद्ध ८८७ धावांची विक्रमी खेळी केली.
- ऑगस्ट १६ - अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
जन्म
- फेब्रुवारी २९ - मोरारजी देसाई, भारताचे माजी पंतप्रधान
- मे २३ - केशवराव भोळे, मराठी संगीत समीक्षक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, लेखक.
- जून १८ - नटश्रेष्ठ बाबूराव पेंढारकर, ज्येष्ठ मराठी अभिनेते.
- जून १९ - वॉलिस सिम्प्सन, ईंग्लंडचा राजा एडवर्ड आठव्याची पत्नी.
- जून २२ - बाबुराव पेंढारकर, भारतीय अभिनेता.
- जुलै ४ - माओ दुन, चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार.
- जुलै १९ - ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.
- ऑगस्ट २८ - फिराक गोरखपुरी, उर्दू कवी.
- सप्टेंबर १ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.
- नोव्हेंबर १२ - डॉ. सलीम अली, एक पक्षीतज्ज्ञ.
मृत्यू
- ऑक्टोबर ११ - आंतोन ब्रुकनर, ऑस्ट्रियन संगीतकार.
- डिसेंबर १० - आल्फ्रेड नोबेल, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ.
- डिसेंबर ३१ - लेलॅंड होन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.