Jump to content

आहार

आहार जेवढा सात्त्विक तेवढा आपल्यासाठी अधिक चांगला. भगवतगीतेमध्ये उल्लेख आहे की आहाराचा आपल्या मन आणि बुद्धीवर परिणाम होतो . मन आणि बुद्धी सात्त्विक करण्यासाठी आहार सुद्धा सात्त्विक असावा.    

आहार बनवताना ईश्वराचे स्मरण करत करत आहार बनवला तर तो प्रसाद होतो.

आहार हे भोजन असून ते इतर अनेक शास्त्रांवर आधारलेले आहे. यामध्ये अनेक अन्नपदार्थाची उपलब्धता आहे. याचा आपल्या आरोग्यासाठी आणि वाढी साठी उपयोग होतो. आहारशास्र हे रसायनशास्र, जीवशास्र, शरीरशास्र, इत्यादी शास्त्रांवर आधारलेले आहे. सर्व जीवनसत्त्वे व खनिजे असलेल्या, शरीरास पूरक असलेल्या संपूर्ण जेवणास (हिंदी: भोजन) आहार असे म्हणतात.

रोजच्या जेवणात पोषक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. अलीकडील काळातील जंक फूड आरोग्यास अतिशय हानिकारक आहे. रोजच्या आहारात कच्च्या पालेभाज्या व भारतीय पद्धतीच्या कोशिंबीरीचे वेगवेगळे प्रकार खावेत.

रोजच्या जेवणात गाजर,काकडी, मुळा वगैरे खाणे खूप महत्त्वाचे असते.