Jump to content

आस्तिक

जी भारतीय दर्शनशास्त्रं वेदांना प्रमाण मानतात त्यांना आस्तिक भारतीय दर्शन मानणारी विचारसरणी म्हणतात. सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही सहा आस्तिक दर्शनें आहेत. आस्तिक म्हणजे ईश्वराला मानणारी हा अर्थ चुकीच्या अर्थाने रूढ झाला आहे. आस्तिकता किंवा नास्तिकता ही वेदांच्या मानणे अथवा न मानणे यावर ठरते.