आश्वी खुर्द
?आश्वी खुर्द महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या | ४,३२२ (२०११) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 413738 • +०२४२५ • MH-१७ (श्रीरामपूर) |
संकेतस्थळ: आश्वी खुर्द ग्रामपंचायत |
आश्वी खुर्द गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील आहे. आश्वी गाव जिल्हा मुख्यालय अहमदनगर पासून ७४ किमीवर स्थित आहे तसेच पुण्यापासुन १६० किमी आहे. गावापासून राहाता ३३ किमी, श्रीरामपूर ४० किमी, कोपरगाव ५० किमी आणि संगमनेर 23 किमी अंतरावर स्थित आहे. आश्वी खुर्द हे ऐतिहासिक गाव असुन राजमाता जिजाऊ छ्त्रपती शिवाजी महाराज पेशवाई च्या पदस्पर्श झालेले गाव प्रवरा नदी तिरावर वसलेले गाव पेशवाई कालखंडात या भागात पेशवे आपली घोडे बांधत म्हणुण येथे घोडयांच्या पागा जास्त होत्या घोडा म्हणजे आश्व व आश्व या वरुण गावास आश्व नाव पडले व पुढे या गावचे आश्वी नाव झाले पेशवे कालखंडात गणेशाची भक्तीला महत्व असल्याने पेशवेकालीन गणेश मंदिर तसेच अहील्याबाई होळकर यांनी येथे घाट व पार बांधला असुन त्रिंबक माधव होनमोडे यांचा पुरातन वाडा याच ठिकाणी आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
भारतीय क्रिकेट खेळाडू अजिंक्य रहाणे याचा जन्म आश्वी येथे झालेला आहे. तो तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे तसेच तो आयपीएल मधील राजस्थान रॉयल्स आणि रणजी ट्रॉफी मधील मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करतो.