Jump to content

आश्विन पौर्णिमा

आश्विन पौर्णिमा ही आश्विन महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंधरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

हिंदू

हिंदू पंचांगातील आश्विन महिन्यातल्या या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणतात. हा हिंदुधर्मातील एक व्रताचार आहे ज्याला सामूहिक स्वरूपात साजरे करताना सण मानले गेले आहे आणि तो उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मातापित्यांचा ज्येष्ठ पुत्र किंवा ज्येष्ठ पुत्री हिची आश्विनी असते. त्यादिवशी त्याला किंवा तिला ओवाळतात, व भेटवस्तू देतात.

या दिवशी अजमेर शहराची ज्याने स्थापना केली त्या अजमीढ राजाची जयंती असते.

बौद्ध

याच पौर्णिमेला महाप्रवारणा पौर्णिमा म्हणतात. हा एक बौद्ध सण आहे. ही पौर्णिमा अशोक विजयादशमीनंतर येते. या दिवशी भिक्खू संघाचा वर्षावास संपतो. वर्षावास संपताना होणाऱ्या उत्सवाच्या दिवशी पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून सर्व उपासक व उपासिका एकत्र जमतात आणि बुद्ध वंदना घेऊन तथागत बुद्धांना वंदन करतात. त्यांनंतर ज्येष्ठ बौद्ध भिक्खू धम्म प्रवचन देतात, प्रवचन संपल्यावर बौद्ध उपासक-उपासिका भिक्खूंना कठीण चिवरदान करतात.

हे ही पहा

  • बौद्ध सण