आश्लेषा (नक्षत्र)
आश्लेषा (नक्षत्र) हे नक्षत्र पुष्य नक्षत्राच्या थेट दक्षिणेस व प्रश्वा (प्रोसियन) या ताऱ्याच्या थेट पूर्वेस आहे. कोणी ईटा व सिग्मा यांच्याऐवजी कॅन्सर (कर्क) पैकी आल्फा व बीटा हे तारे यात घेतात. हे नक्षत्र कर्कराशीतील आहे. आश्रेषा असाही याचा नामोल्लेख क्वचितच आढळतो. २ ऑगस्टच्या सुमारास या नक्षत्रात सूर्यप्रवेश होतो. याची देवता सर्प व आकृती चक्र समजली जाते.
हे सुद्धा पहा
भारतीय २७ नक्षत्रांपैकी नववे नक्षत्र. यात हायड्रा या पाश्चात्त्य तारकासमूहापैकी झीटा, एप्सायलॉन, डेल्टा, सिग्मा व ईटा या ताऱ्यांचा समावेश आहे. झीटा या ताऱ्याचे विषुवांश ८ ता. ५४ मि., क्रांती ६०९’ उ., प्रत ३·३० [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] असून हा योगतारा (मुख्य तारा) मानतात (कोणी एप्सायलॉन हाही मानतात). इतर चार तारे चवथ्या प्रतीचे आहेत. हे नक्षत्र पुष्य नक्षत्राच्या थेट दक्षिणेस व प्रश्वा (प्रोसियन) या ताऱ्याच्या थेट पूर्वेस आहे. कोणी ईटा व सिग्मा यांच्याऐवजी कॅन्सर (कर्क) पैकी आल्फा व बीटा हे तारे यात घेतात. हे नक्षत्र कर्कराशीतील आहे. आश्रेषा असाही याचा नामोल्लेख क्वचितच आढळतो. ऑगस्टच्या सुमारास या नक्षत्रात सूर्यप्रवेश होतो. याची देवता सर्प व आकृती चक्र समजली जाते.
ठाकूर, अ .ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)