आशुतोष जावडेकर
डॉ. आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिक्त ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.
कौटुंबिक
आशुतोष जावडेकरांचे वडील प्रकाश जावडेकर हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असून, आई डॉ. प्राची जावडेकर या नामवंत शिक्षणतज्ज्ञ, संशोधक आणि शिक्षण सल्लागार आहेत. त्या पूर्वी पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टच्या प्रमुख होत्या. आशुतोष जावडेकरांच्या भगिनी अपूर्वा जावडेकर यांनी बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केले आहे.