आशिष माने
आशिष माने (१४ ऑगस्ट, १९९०:महाराष्ट्र, भारत) हा भारतीय गिर्यारोहक आहे.[१] त्याने एव्हरेस्ट, लोटसे, मकालू, मनस्लु आणि कांचनजंगा याचे पर्वतारोहण केले. आशिष हे महाराष्ट्रातील एकमेव गिर्यारोहक आहेत ज्याने ८००० मीटर पेक्षा जास्त पाच शिखर चढले आहेत.[२]
जीवन आणि शिक्षण
आशिषचा जन्म महाराष्ट्रातील सातारा येथे झाला. त्यानेपुण्याच्या कोथरूडमधील शिवराय प्रतिष्ठान महाविद्यालयात शिक्षण घेतले[३]. त्यांने संगणक विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांने उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटनीयरिंगमधून आपला मूलभूत पर्वतारोहण अभ्यासक्रम केला.[४]
मोहीम
- माउंट एव्हरेस्ट २०१२
- ल्होत्से २०१३
- मकालू २०१४
- मानसलू २०१७
- कांचनजंगा २०१९
पुरस्कार
- शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (२०१४-२०१५)
संदर्भ
- ^ "Jubilant Giripremi team returns after Everest summit". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2013-05-30. 2020-12-05 रोजी पाहिले.
- ^ "12 mountaineers from Pune scaled Mount Everest | Pune News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी पाहिले.
- ^ "10 mountaineers from India summit Mt. Kanchenjunga". ANI News (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी पाहिले.
- ^ "Mount Makalu: Pune lad scales Mount Makalu braving bad weather | India News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी पाहिले.