आल्बेनियाचा झॉग
झॉग (ऑक्टोबर ८, इ.स. १८९५ - एप्रिल ९, इ.स. १९६१) हा आल्बेनियाचा पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष तसेच राजा होता.
याचे मूळ नाव अहमेत मुहतार बेज झोगोली होते. हा १९२२-२४ दरम्यान पंतप्रधान, १९२५-२८ दरम्यान राष्ट्राध्यक्ष तर १९२८-३९ दरम्यान आल्बेनियाच्या राजेपदी होता.