आल्बर्टा
आल्बर्टा Alberta | |||
कॅनडाचा प्रांत | |||
| |||
कॅनडाच्या नकाशावर आल्बर्टाचे स्थान | |||
देश | कॅनडा | ||
राजधानी | एडमंटन | ||
सर्वात मोठे शहर | कॅल्गरी | ||
क्षेत्रफळ | ६,६१,८४८ वर्ग किमी (६ वा क्रमांक) | ||
लोकसंख्या | ३६,६२,४८३ (४ वा क्रमांक) | ||
घनता | ५.३८ प्रति वर्ग किमी | ||
संक्षेप | AB | ||
http://www.alberta.ca |
आल्बर्टा हा कॅनडा देशाच्या पश्चिम भागातील एक प्रांत आहे. आल्बर्टाच्या पूर्वेला सास्काचेवान, पश्चिमेला ब्रिटिश कोलंबिया, उत्तरेला नॉर्थवेस्ट टेरिटोरीज तर दक्षिणेला अमेरिकेचे मोंटाना हे राज्य आहेत. एडमंटन ही आल्बर्टाची राजधानी तर कॅल्गरी हे सर्वात मोठे शहर आहे.
कॅनडाच्या गवताळ प्रदेशात स्थित आल्बर्टाच्या नैऋत्य भागात रॉकी पर्वतरांग तर उत्तर भागात तैगा प्रदेश आहेत. मध्य व दक्षिण भागात जवळजवळ सर्व लोकवस्ती एकवटली आहे. आल्बर्टाची लोकसंख्या २०१० साली ३७ लाख होती. १ सप्टेंबर १९०५ रोजी निर्माण करण्यात आलेल्या आल्बर्टा प्रांताला आपले नाव इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीची मुलगी राजपुत्री लुईस कॅरोलाइन आल्बर्टा हिच्या नावापासून मिळाले आहे.
आर्थिक दृश्ट्या आल्बर्टा हा कॅनडामधील सर्वात पुढारलेल्या व विकसित प्रांतांपैकी एक आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅनडामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आल्बर्टामध्ये मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. आल्बर्टा हा नैसर्गिक वायू निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमंकावर आहे. तसेच शेती हा येथील एक मोठा उद्योग आहे. गहू व भुईमुग ही येथील प्रमुख पिके आहेत.