आल्बनी काउंटी (न्यू यॉर्क)
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील आल्बनी काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, आल्बनी काउंटी (निःसंदिग्धीकरण).
आल्बनी काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केंद्र आल्बनी येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३,१४,८४८ इतकी होती.[२] आल्बनी काउंटीची रचना १ ऑक्टोबर, १६९१ रोजी झाली. या काउंटीला इंग्लंडचा दुसरा जेम्स (यॉर्क आणि आल्बनीचा ड्यूक) यांचे नाव दिलेले आहे. आल्बनी काउंटी आल्बनी-स्केनेक्टेडी-ट्रॉय महानगरक्षेत्राचा भाग आहे.
वाहतूक
आय-९० आणि आय-८७ हे महामार्ग आल्बनी काउंटीतून जातात. आल्बनी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे. आल्बनी रेल्वे स्थानकातून रॉचेस्टर, बफेलो, न्यू यॉर्क शहर, रटलँड (व्हरमाँट), बॉस्टन आणि कॅनडातील माँत्रिआल, टोराँटो शहरांना रेल्वे सेवा उपलब्ध आहे.
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Albany County, New York; United States". Census.gov. 2022-07-20 रोजी पाहिले.