आल्प्स
आल्प्स पर्वत आल्पेन (जर्मन) | ||||
| ||||
देश | ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन | |||
सर्वोच्च शिखर | मॉंट ब्लॅंक, इटली उंची - ४,८०८ मी. | |||
|
ही युरोपामधील प्रमुख पर्वतरांग आहे. सुमारे १,२०० किमी विस्तार असलेली आल्प्स पर्वतरांग फ्रान्स, जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्लोव्हेनिया, लिश्टेनस्टाइन व मोनॅको ह्या देशांमध्ये पसरली आहे. इटलीतील मॉंट ब्लॅंक हे आल्प्समधील सर्वात उंच शिखर असून त्याची उंची ४,८०८ मी ( १५,७७४ फुट) इतकी आहे. मॅटरहॉर्न हे देखील आल्प्समधील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे.
पुरातन काळापासून आल्प्समध्ये मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. रोमन लोकांची येथे वसाहत होती व हॅनिबल ह्या महान योद्ध्याने आल्प्समधून प्रवास केल्याचे मानले जाते.
आजच्या घटकेला १.४ कोटी लोक आल्प्स पर्वतरांगेमध्ये राहतात व दरवर्षी अंदाजे १२ कोटी पर्यटक येथे भेट देतात.