आलेप
आलेप : (आयुर्वेद). व्रणात रूपांतर होऊ शकेल अशा सर्व सुजांवर उपयुक्त असा पहिला व मुख्य उपचार लेप होय. तो केसांच्या उलट दिशेने लावावा म्हणजे औषध त्वचेला नीट लागते व राहते त्वचेच्या छिद्रात केसांच्या मुळांतून शिरते तेथे पचन होऊन शिरांच्या तोंडातून त्याचे वीर्य आत जाते व सुजेचे दोष नष्ट करिते. हा लेप सुकल्यावर काढावा कारण त्याचा उपयोग होत नाही उलट वेदना होतात व्रणावर दाब निर्माण करावयाचा असेल तरच पीडन औषधांचा लेप सुकला तरी ठेवावा.
प्रकार
प्रलेप, प्रदेह व आलेप. प्रलेप : पातळ, थंड, ओला तसाच नंतर सुकलेलाही असतो. हा रक्तपित्तात्मक सुजेवर उपयुक्त. प्रदेह : उष्ण किंवा थंड, जाड किंवा थोडा जाड पण ओलाच असतो. वातकफशामक, शोधक, रोपक, वेदना व सूजनाशक. हा व्रणावरही उपयुक्त.
स्नेहोपयोग
वातकफपित्तांवरच्या आलेपात क्रमाने १/४, १/६ व १/८ स्नेह घालावा.
- प्रमाण : आलेप, म्हशीच्या ओल्याकातड्याच्या जाडी इतका असावा.
- निषेध : रात्री, शिळा किंवा लावलेला वा सुकलेला, पुन्हा ओला करून तो लावू नये.
- लेपावर लेप लावू नये.