आर्या (वृत्त)
आर्या काव्यछंद कवी मोरोपंतांनी खूप हाताळला. खऱ्या अस्सल आर्येत पहिल्या ते चौथ्या चरणामध्ये अनुक्रमे १२,१८ व १२,१५ अशा मात्रा असतात. त्याबद्दलची पुढील आर्या प्रसिद्ध आहे.
- ओवी ज्ञानेशाची
- अभंगवाणी तुकयाची
- सुश्लोक वामनाचा
- आर्या मयूरपंतांची
आर्या वृत्ताचे लक्षणगीत
यस्या: प्रथमे पादे द्वादश मात्रास्तथा तृतीयेऽपि । (पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा,)
अष्टादश द्वितीये, चतुर्थके पञ्चदश साऱ्या ॥ (दुसऱ्यात १८ व चौथ्यात १५ मात्रा असतात ती आर्या. )
उदाहरण
ती तातास म्हणे कच, (१२ मात्रा)
गुरुभक्त साधू कुलीन कार्यकर (१८ मात्रा)
परि त्यास सोडिले जळ, (१२ मात्रा)
जळ सोडूं मजही आर्यकर ...... मोरोपंत