Jump to content

आर्य मासिक

आर्य
प्रकार तत्त्वज्ञानात्मक मासिक
भाषा इंग्रजी, फ्रेंच
संपादक अरविंद घोष
खप भारत, इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्स
स्थापना १९१४
पहिला अंक १५ ऑगस्ट १९१४
देश भारत


प्रारंभ आणि अखेर

प्रारंभ - दि. १५ ऑगस्ट १९१४

अखेर - जानेवारी १९२१

संस्थापक

इ.स. १९१४ मध्ये मिसेस मीरा अल्फान्सा (उत्तरायुष्यातील श्रीमाताजी) आणि त्यांचे पती मि.पॉल रिचईस यांच्या समवेत योगी श्रीअरविंद यांनी आर्य या तत्त्वज्ञानात्मक मासिकाचे कार्य हाती घेतले.

लेखन

श्रीअरविंदांचे (अरविंद घोष) यांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी सर्व साहित्य 'आर्य'मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे. ते पुढीलप्रमाणे -

Synthesis of Yoga (योगसमन्वय),

Essays on the Gita (गीतेवरील निबंध),

Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य),

Life Divine (दिव्य जीवन),

The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया),

The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श)

सुमारे साडेसहा वर्षे म्हणजे इ.स. १९२१ पर्यंत हा अंक नियमितपणे प्रकाशित होत असे. मिसेस मीरा अल्फान्सा या फ्रान्सला परत गेल्यानंतर अंकाच्या ६४ पानांचे लिखाण करण्याची जबाबदारी श्रीअरविंद यांनी स्वीकारली होती.

कार्यालय

No.41 Rue Francois Martin, Pondicherry येथे आर्य मासिकाचे कार्यालय होते. येथेच श्रीअरविंद वास्तव्यास होते.

संदर्भ

०१) Life of Sri Aurobindo by A.B.Purani