आर्य महिला समाज
आर्य महिला समाज ही महाराष्ट्राच्या पुणे शहरातील एक धार्मिक व सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या विचारसरणीवर ब्राह्मो समाज, येशू ख्रिस्त आणि १९व्या शतकातील मराठी समाजसुधारकांचा प्रभाव आहे. या संस्थेचे मूळ उद्देश स्त्रीयांची शिक्षणोन्नती आणि बाल-जरठ विवाहास विरोध हे होते.[१] आजही ही संस्था मुलींसाठी वसतीगृहे आणि इतर योजना चालवते. मुंबईच्या गावदेवी भागात असे एक वसतीगृह आहे.[२]
पंडिता रमाबाईंनी या आर्य महिला समाजाची स्थापना १ मे, १८८२ रोजी केली.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Kosambi, Meera (October 24–31, 1992). "Indian Response to Christianity, Church and Colonialism: The Case of Pandita Ramabai". Economic and Political Weekly. 27 (43/44): WS-62. JSTOR 4399059 – JSTOR द्वारे.
- ^ "गूगल नकाशा". गूगल नकाशा. २०२२-०४-३० रोजी पाहिले.