आर्मागेडन
आर्मागेडन : नव्या करारानुसार (रेव्हेलेशन-१६:१६) जगाच्या अंतःसमयी सुरशक्ती व असुरशक्ती यांच्यामध्ये श्रेष्ठत्वाबद्दल होणाऱ्या संग्रामाचे रणक्षेत्र. ‘हार मेगिडो’ म्हणजे मेगिडोचा पर्वत या हिब्र शब्दावरून आर्मागेडन हा शब्द आला असावा. इझ्राएलमधील मेगिडो पर्वताजवळील मोक्याच्या खिंडीजवळ प्राचीन काळी अनेक लढाया झाल्या. आर्मागेडन म्हणजे सुष्टदुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष असेही म्हणण्याची प्रथा आहे.