आर्द्रा (नक्षत्र)
आर्द्रा (नक्षत्र) हे आकाशातील २७ नक्षत्रांपैकी एक नक्षत्र आहे. इंग्रजीत याला Athena किंवा Gamma Geminorum म्हणतात. हिंदू ज्योतिषशास्त्रात मानल्या गेलेल्या राहू या ग्रहाची ही देवता समजली गेली आहे.
हे सुद्धा पहा
भारतीय २७ नक्षत्रांपैकी सहावे नक्षत्र. यात एकच तारा मानतात. या ताऱ्याचे पाश्चात्य नाव गॅमा जेमिनोरम (अॅल्हेना) असून त्याचे विषुवांश ६ ता. ३४ मि., क्रांती १६०२७’, प्रत १.९३ [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति; प्रत] आहेत. २१ जूनच्या सुमारास सूर्य या नक्षत्रात प्रवेश करतो. आर्द्र म्हणजे ओले. हे पावसाचे महत्त्वाचे नक्षत्र असल्याने हे नाव पडले असावे. याचा समावेश मिथुन राशीमध्ये होतो. कोणता तारा आर्द्राचा मानावा याबाबत मतभेद आहेत. कोणी कांक्षि वा कक्ष म्हणजे आल्फा ओरिऑनिस (बेटलज्यूझ) हा, तर कोणी व्याधाचा ताराही आर्द्राचा मानतात. परंतु कांक्षि हा मृगातील समजणे इष्ट आणि व्याधाचाही मृगाशीच संबंध असतो. म्हणून गॅमा जेमिनोरम हाच आर्द्राचा मानणे युक्त, असे शं. बा. दीक्षित यांचे मत आहे. या नक्षत्राची देवता रुद्र व आकृती मणी मानली आहे.
ठाकूर, अ. ना.(स्रोत: मराठी विश्वकोश)