आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस
आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस ( ८ ऑगस्ट १८७५, मृत्यु:२३ मार्च १९५५) हा एक ब्राझिलियन राजकारणी होता.ब्राझिलच्या प्रजासत्ताकाचे दरम्यान, तो ब्राझिलचा १२ वा राष्ट्राध्यक्ष होता. मिनास जेराईस या राज्यामधील व्होकोसा या गावात जन्मलेला 'आर्तुर दा सिल्वा बर्नार्देस' हा सन १९१८ मध्ये मिनास जेराईसचा गव्हर्नर झाला. सन १९२२मध्ये त्याला ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. तो त्या पदावर १९२६ पर्यंत होता.