आर्गो
आर्गो | |
---|---|
दिग्दर्शन | बेन ॲफ्लेक |
निर्मिती | बेन ॲफ्लेक जॉर्ज क्लूनी |
पटकथा | ख्रिस टेरियो |
प्रमुख कलाकार | बेन ॲफ्लेक ब्रायन क्रॅन्स्टन ॲलन अर्किन जॉन गुडमन |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | १२ ऑक्टोबर २०१२ |
वितरक | वॉर्नर ब्रदर्स |
अवधी | १२० मिनिटे |
निर्मिती खर्च | $४४.५ दशलक्ष |
एकूण उत्पन्न | $२३२.३ दशलक्ष |
आर्गो हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे. बेन ॲफ्लेकचे दिग्दर्शन व प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रदर्शित झाला. एका सत्यकथेवर आधारित असलेल्या आर्गोमध्ये १९७९ सालच्या इराणी क्रांतीदरम्यान तेहरानमध्ये अडकलेल्या अमेरिकन दूतावास कर्मचाऱ्यांची सी.आय.ए. व कॅनडाद्वारे करण्यात आलेल्या सुटकेची कथा रंगवली आहे.
आर्गोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तसेच तो टीकाकारांच्या देखील पसंतीस उतरला. विशेषतः बेन ॲफ्लेकचे दिग्दर्शन व प्रमुख कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. ८५व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये आर्गोला सर्वोत्तम चित्रपटासह इतर तीन पुरस्कार मिळाले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील आर्गो चे पान (इंग्लिश मजकूर)