आरोहण आणि अवरोहण (पूर्णयोग)
आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) या श्रीअरविंद प्रणीत पूर्णयोगातील महत्त्वाच्या संकल्पना आहेत.
व्याख्या
साधकाने उर्ध्वस्थित असणाऱ्या आत्म्याप्रत आणि दिव्य ईश्वरी प्रकाश, ज्ञान, शक्ती, शांती, आनंद यांच्याप्रत खुले होणे, उन्नत होणे म्हणजे आरोहण आणि त्या गोष्टी आपल्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये (म्हणजे मन, प्राण व शरीर यांमध्ये) आपल्या देहामध्ये अवतरित होणे म्हणजे अवरोहण.[१]
इतर योगमार्गांमध्ये आरोहणाला (विशेषतः कुंडलिनीच्या) महत्त्व असते. परंतु पूर्णयोगामध्ये आरोहण ही केवळ पहिली पायरी असते. अधिक प्राधान्य दिलेले असते ते अवरोहणाला. ते पूर्णयोगाच्या साधनेचे वैशिष्ट्य आहे. [२]
संदर्भ
- ^ A.S.Dalal (2002). Emergence of the Psychic (Governance of Life by the Soul). Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication Department. ISBN 81-7058-688-7.
- ^ Sri Aurobindo. On himself, (Sri Aurobindo Birth Centenary Library). Pondicherry: Sri AurobindD Ashram Trust 1972. p. 109.