आरोपी अभिनेत्यांची यादी
या लेखामध्ये अशा अभिनेत्री आणि अभिनेत्यांचा समावेश आहे, ज्यांच्यावर गुन्हेगारी आरोप लावलेले आहेत, किंवा ते आरोप सिद्ध झालेले आहेत किंवा त्यांचे खटले प्रलंबित आहेत.
यादी
- गुलशनकुमार : कॅसेटच्या धंद्यात वैर करून घेतल्यामुळे खून होऊन प्राणास मुकला.
- गोविंदा : दुबईत जाऊन गुंडांशी दोस्ती केल्याने संकटात आला.
- जॉनी लिव्हर : दुबईत कार्यक्रम करताना अंडरवर्ल्डच्या डॉनशी दोस्ती झाली. भारताच्या ध्वजाचा अपमान केल्याबद्दल कोर्टाच्या खटल्यात अडकला.
- तब्बू : सलमान खानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी.
- नदीम : नदीम-श्रवण जोडीतला संगीत दिग्दर्शक. गुलशकुमारच्या खुनाचा आरोप असल्याने भारतातून पलायन.
- नीलम : सलमान खानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी.
- पुरु : राजकुमार या नटाचा मुलगा. फुटपाथवर गाडी चालवून सात जणांना चिरडले.
- फरदीन खान : अभिनेता फिरोज खानचा मुलगा. अंमली पदार्थाच्या खरेदी-विक्रीच्या गुन्ह्यात अडकला. त्याच्याजवळ कोकेन सापडले.
- ममता कुलकर्णी : हिंदी चित्रपटसृष्टीतली १९९० च्या दशकात कामुक भूमिका करणारी नटी. विजयगिरि आनंदगिरि गोस्वामी उर्फ विकी गोस्वामी हे तिच्या जोडीदाराचे नाव. हा माणूस एक कुप्रसिद्ध ड्रग माफिया आहे. ममतासुद्धा तेच काम करत असावी असा आरोप आहे.
- मंदाकिनी (यास्मिन जोसेफ) : दाऊद इब्राहिम या भारतद्रोही गुंडाबरोबर संबंध ठेवल्यामुळे चित्रपट व्यवसायातून बाहेर फेकली गेली.
- मोनिका बेदी : गुंड अबू सालेमबरोबर दुबईला गेली. अबू सालेमला अटक झाल्यावर तीही बनावट पासपोर्ट प्रकरणात सापडली.
- राजीव राय : हा त्रिदेव, मोहरा यांसारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा निर्माता. पण गुंडांशी संबंध ठेवला. पुढे धमक्या मिळू लागल्यामुळे भारत सोडून परागंदा झाला.
- शायनी आहुजा : मोलकरणीवर बलात्कार केल्याबद्दल तुरुंगात गेला.
- शाहरुख खान : क्रिकेट स्टेडियमच्या रखवालदारांशी मारामारी केली आणि तीन वर्षे स्टेडियमकडे ढुंकूनही न पाहण्याची शिक्षा झाली.
- श्वेता बासू : ’मकडी’ चित्रपटापासून प्रसिद्ध झालेली श्वेता हैदराबादच्या एका हॉटेलात वेश्याव्यसायाचे रॅकेट चालवताना पकडली गेली. (३१ ऑगस्ट २०१४).
- संजय दत्त : मुंबईत ज्यांना बॉबस्फोट घडवून आणायचे होते, त्यांच्या शस्त्रांनी भरलेला ट्रक संजय दत्तने बंगल्यात एक रात्र ठेवून घेतला आणि त्या मोबदल्यात त्यांच्याकडून एक एके४७ गन घेतली. पुढे ही गन त्याने वितळून टाकली, पण तिचा एक लहानसा तुकडा शिल्लक राहिला आणि संजय दत्त पकडला गेला.
- सलमान खान : राजस्थानात जाऊन काळवीट मारले. दारूच्या नशेत फुटपाथवर गाडी नेऊन अनेकांना मारले आणि पलायन केले. आपल्या ड्रायव्हरवर प्रकरण शेकविण्याचा प्रयत्न केला.
- सैफ अली खान : सलमान खानच्या काळवीट प्रकरणातलाे सहआरोपी. करीना कपूरबरोबर एका हॉटेलात खाना खाताना तिथल्याच एका कुटुंबाला मारहाण केली आणि आणि पोलीस चौकीत रात्र काढावी लागली.
- सोनाली बेंद्रे : सलमान खानच्या काळवीट प्रकरणातली सहआरोपी.
हे ही पहा
- भारतीय नाट्य-चित्रपटांतील अल्पायुषी अभिनेते