Jump to content

आरुणिकोपनिषद

आरुणिकोपनिषद तथा आरुण्युपनिषद हे एक सामवेदीय उपनिषद मानले जाते. या उपनिषदात अरुणी ऋषीच्या वैराग्य जिज्ञासेस उत्तर देताना प्रजापती ब्रह्म्याने संन्यासदीक्षित होण्याची सूत्रे सांगितलेली आहेत. संन्यास घेण्यासाठी ब्रह्मचारी, गृहस्थ आणि वानप्रस्थ ह्या तिघांनाच अधिकृत परवानगी दिलेली आहे. संन्याशाच्या यज्ञ-यज्ञोपवीत आदि कर्मकांडांच्या प्रतीकांच्या त्यागाचे मार्मिक स्वरूप उलगडून दाखविले आहे. संन्याशी यज्ञाचा त्याग करीत नाही, तो स्वतः यज्ञरूप बनून जातो; तो ब्रह्मसूत्र त्यागत नाही, त्याचे जीवनच ब्रह्मसूत्र होऊन जाते; तो मंत्र त्यागत नाही, त्याची वाणी मंत्ररूप होऊन जाते - या सर्व महत्त्वपूर्ण सूत्रांना जीवनाच्या अंतरंगात धारण केल्याने तो संन्याशी अर्थात ‘सम्यक रूपाने धारण करणारा ठरतो’. संन्यास ग्रहण करण्याच्या स्थूल कर्मकांडांचाही उल्लेख या उपनिषदात केलेला आहे.