Jump to content

आरिफा जान

Arifa Jan (nl); आरिफा जान (mr); ఆరిఫా జాన్ (te); அரிஃபா ஜான் (ta); Arifa Jan (sq); Arifa Jan (en); ആരിഫ ജാൻ (ml); Arifa Jan (ast) activista india (es); militante indienne (fr); aktibista indiarra (eu); activista india (ast); activista índia (ca); Activist for rug making in India (en); ativista indiana (pt); activista india (gl); Activist for rug making in India (en); attivista indiana (it); Indiaas activiste (nl)
आरिफा जान 
Activist for rug making in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखc. इ.स. १९८७
नागरिकत्व
व्यवसाय
  • कार्यकर्ता
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आरिफा जान (जन्म: १९८७) या काश्मीरमधील श्रीनगर येथे रग बनवणारी भारतीय महिला आहेत. जान यांना ८ मार्च २०२० रोजी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आरिफा जानचा जन्म इ.स. १९८७ साली झाला. नामदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मिरी रग बनविण्याच्या कलेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत.[] त्यांनी क्राफ्ट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, श्रीनगरमधून पदवी प्राप्त केली आणि नामदा टेक्सटाइल्सवर आधारित प्रकल्पात त्या गुंतलेल्या आहेत.[] ११ व्या शतकापासून नामदा रग्ज बनवले जात आहेत. हे रग विणलेले नसून फेल्ट केलेले आहेत; ज्यात वुलन फायबरचे थर एकत्र ठोकून कुटून त्यावर चमकदार भरतकाम केले जाते. श्रीनगर मधील जुने भाग यासाठी ओळखले जातात. मात्र आता रंगाईसारखी काही कौशल्ये तितकीशी लोकप्रिय नाहीत.[]

त्यांनी तीन उत्पादन केंद्रे निर्माण केली आहेत ज्यात २५ लोक काम करतात. तसेच १०० महिलांना हे फेटेड रग्ज तयार करण्यासाठी प्रशिक्षित केले गेले आहे. पहिले निर्मिती केंद्र श्रीनगरच्या जुन्या भागात होते. नंतर परत त्यांनी श्रीनगर, नूरबाग आणि नवा कादल या दोन इतर भागातही अशाच संघटना निर्माण केल्या.[]

२०२० साली आंतरराष्ट्रीय महिला दिनी नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी सह समोर-उजवीकडे अरिफा जान

"मॅग्निफिसेंट सेव्हन" म्हणून गणल्या जाणाऱ्यापैकी एक जान आहेत. महिला दिनी पंतप्रधानांचे खाते हाताळण्यासाठी या सात महिलांची निवड करण्यात आली होती. चेन्नईस्थित सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा मोहनडोस, बॉम्बस्फोटात वाचलेली मालविका अय्यर, काश्मिरी नुमधा मशरूम शेतकरी बीना देवी, शहरी जलसंरक्षक कल्पना रमेश, महाराष्ट्र बंजारा हस्तकला प्रवर्तक विजया पवार आणि महिला मेसन कलावती देवी यांचा त्यात समावेश होता. []

त्याच दिवशी त्यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.[] तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.[]

संदर्भ

  1. ^ "Arifa Jan's journey: From reviving 'Namda' art to Nari Shakti Puraskar". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-03-08. 2020-04-09 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Arifa Jan's journey: From reviving 'Namda' art to Nari Shakti Puraskar". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-03-08. 2020-04-09 रोजी पाहिले.
  3. ^ "Namda - The traditional felted craft of Kashmir". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-02-17. 2020-04-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Get out, work yourself: 'Mushroom Mahila' message to women | INDIA New England News". indianewengland.com. 2020-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-12 रोजी पाहिले.
  5. ^ Dainik Bhaskar Hindi. "Women's Day 2020: President Kovind awarded Nari Shakti Puraskar to Bina Devi and many women | Women's Day 2020: 103 वर्षीय मान कौर को नारी शक्ति पुरस्कार, 'मशरूम महिला' भी सम्मानित - दैनिक भास्कर हिंदी". bhaskarhindi.com. 2020-03-12 रोजी पाहिले.
  6. ^ "Meet the 7 women achievers who took over PM Modi's social media accounts on Women's Day: PM Modi's 'magnificent seven'". The Economic Times. 2020-04-05 रोजी पाहिले.