आरळम संरक्षित वनक्षेत्र
आरळम संरक्षित वनक्षेत्र हे भारताच्या केरळ राज्यातील संरक्षित वनक्षेत्र आहे. हे वनक्षेत्र सह्याद्रीच्या डोंगररांगांत वसले आहे. ५५ वर्ग कि.मी. क्षेत्रफळाच्या या वनक्षेत्रामध्ये हत्ती, हरणे, रानगवे व रानडुकरे आढळतात. येथून ३५ कि.मी. अंतरावर तलश्शेरी, तर ६० कि.मी. अंतरावर कण्णूर, ही शहरे आहेत.