Jump to content

आयुर्वेदातील विविध संज्ञा

आयुर्वेदात वापरण्यात येणाऱ्या विविध संज्ञांची यादी व त्याचे थोडक्यात वर्णन-

  • अग्निदीपक - भूक वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
  • अनुपान - औषधसेवनास सहाय्यीभूत पदार्थ, तरल पदार्थ अथवा दुसरे औषध.
  • अपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
  • अवलेह - साखरेचा गुळाचा पातळ पाक.
  • आसव/अरिष्ट -
  • कफघ्न -वाढलेला कफ कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
  • काढा - काढ्यातील घटकद्रव्याच्या वजनाच्या १६ पट पाणी घालून ते पाणी अष्टमांश(१/८) राहीपर्यंत मंदाग्नीवर उकळविणे.नंतर गाळून घेणे.
  • कुपथ्य - शरीरास/आरोग्यास अहितकारक
  • केश्य - केश वाढविण्यास मदत करणारे पदार्थ किंवा औषध.
  • चूर्ण - सुकलेल्या वनस्पती कुटून मग त्या गाळून तयार झालेला बारीक वस्त्रगाळ पदार्थ.
  • ज्वरघ्न - तापाचे हनन करणारे पदार्थ किंवा औषध.
  • दाहकारक -आतड्यात / पोटात जळजळ उत्पन्न करणारे, मसालेदार, तिखट पदार्थ अथवा औषध.
  • पथ्य - शरीरास/आरोग्यास हितकारक
  • प्राणिज - प्राण्याच्या अवयवापासून अथवा दूध, अस्थी, मूत्र, मल इत्यादींपासून उत्पन्न झालेले किंवा उत्पादित केलेले.
  • पित्तशामक - वाढलेले पित्त कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
  • पित्तहारक - शरीरात पित्त वाढले असता ते कमी करणारे पदार्थ किंवा औषध.
  • फांट - घटकद्रव्याच्या वजनाच्या चौपट पाणी घालून चांगले उकळवून तयार केलेले द्रावण.
  • भस्म - एखादा औषधी पदार्थावर जाळण्याची/उष्णतेची प्रक्रिया करून उपलब्ध झालेली राख.
  • मारण - धातूंचे भस्म तयार करण्याचा एक नियंत्रित विधी.
  • मूत्रल - शरीरातील दोष लघवीवाटे निघून जावे्त यासाठी मूत्राचे प्रमाण वाढविणारे औषध.
  • रेचक - ज्या औषधाने रेच/जुलाब होतात असे औषध.
  • लेप - शरीराचे कोणत्याही अंगावर ज्याचे लेपन केले जाते तो.
  • वटिका - गोळ्या
  • वांतिकारक - सेवन केल्यास उलटी होईल असे पदार्थ किंवा औषध.
  • वायुकारक - वायू वाढविणारे पदार्थ किंवा औषध.
  • शोधन - शुद्ध करणे
  • स्नेहन - वंगणासारखे काम करणारे, चोपडेपणा आणणारे पदार्थ किंवा औषध.
  • स्वरस - अंगरस. ओल्या वनस्पतीस अथवा पानांना कुटून व स्वच्छ फडक्याने गाळून जो रस निघतो त्या रसाला स्वरस म्हणतात.
  • स्वेदन / स्वेदजनन - घाम आणणारे पदार्थ किंवा औषध किंवा उपाययोजना.
  • हिम /शीतकषाय - घटकद्रव्याच्या वजनाच्या सहापट पाणी घालून व रात्रभर भिजत ठेवून सकाळी गाळून घेतल्यावर तयार होणारे औषध.
  • हीनवीर्य - ज्यात कस उरला नाही असे पदार्थ किंवा औषध.
  • वामक - उलटी करवणारे.
  • श्लेष्मल - श्लेमा वाढविणारे
  • दाह - जळजळ
  • शोथ -
  • आनुलोमिक -
  • कासहर - खोकला दूर करणारे
  • विषहर - विषाचा प्रभाव कमी/दूर करणारे
  • काढा
  • पाचक - पचनास मदत करणारे औषध अथवा पदार्थ.

हे सुद्धा पहा

.