Jump to content

आयुर्दाय

ज्योतिषशास्त्रदृष्ट्या आयुर्दायाचा विचार करताना स्थूलमानाने आयुष्याचे अल्पायू, मध्यायू व दीर्घायू असे तीन प्रकार होतात. वयाच्या १२ वर्षापर्यंत मृत्यू आल्यास अल्पायू, पुढे ४० वर्षापर्यंत आल्यास मध्यायू, पुढे ६० च्यावर असता दीर्घायू असे सर्वसाधारणपणे वर्गीकरण करता येईल.

जन्मकुंडलीवरून आयुर्दाय ठरविताना पुढील गोष्टींचा विचार करावा लागतो.

लग्न, अष्टमस्थान, चतुर्थ, षष्ठस्थान, व्ययस्थान तसेच काही ग्रहयोग, जसे की षष्ठेश व्ययस्थानी (रोगामुळे हॉस्पिटल), षष्ठेश अष्टमात, (रोगामुळे मृत्यूची शक्यता)

अष्टमस्थानाला इतर नावें अशी आहेत – १) पणफरस्थान २) चतुरस्त्रस्थान ३) पीडा स्थान ४) दृक्स्थान  ५)त्रिकस्थान ६) अपचयस्थान ७) आयुष्यस्थान ८) मोक्षस्थान ९) परावलंबी स्थान १०) रंध्र स्थान ११) मृत्यू स्थान १२) आयूःस्थान १३) विनाशन स्थान१४) पराभव स्थान १५) च्यूति स्थान १६) बंधन स्थान.

 मृत्यू -  नैसर्गिक /  अनैसर्गिक

नैसर्गिक :- जन्मतः  / वार्धक्याने

अनैसर्गिक :- आजार / अपघात / वाहनाने / खून  /  आत्महत्या

मृत्यू – फलस्वरूप, फलकाल (कधी?) –

फलस्वरूप पाहताना प्रथम स्थाने विचारात घ्यावीत. (१, ४, ६, ८, १२)

त्या स्थांनातील राशि, ग्रह, त्या नंतर कारक ग्रह म्हणजे रवी-पुरुष , चंद्र-स्त्री , ग्रहांची नक्षत्रे, भावेश, अवस्था,

दृष्टीयोग, अंशात्मक योग, महादशा, अंतर्दशा, विदशा आणि ग्रहांची दैनिक गती(वक्री, अस्तंगत वगैरे) म्हणजेच

प्रत्येक ग्रहाचे बल अभ्यासावे लागते.

अष्टमस्थान हे मृत्यूचे कारकस्थान आहे. अष्टमस्थान व त्या स्थानी असलेलला ग्रह मृत्यूसंबंधी निर्देश देतो.

उदाहरणार्थ: -

अष्टमथानी हर्षल- आकस्मिक, सामुदायिक अपघाती मृत्यू,(कनिष्क विमान अपघात, तेहरान भूकंप)

नेपच्यून - गूढ मृत्यू, श्वास कोंडुन किंवा घुसमटुन मृत्यू (भोपाळ वायू दुर्घटना) तसेच मृत्यूपश्चात मृतदेह न

सापडणे.

शनी- दीर्घ आजाराने व अंथरुणात खितपत मृत्यू.

चतुर्थस्थान मृत्यूचे वेळची परिस्थिती, वातावरण (आनंदाचे किंवा दुःखाचे) यांचा बोध करते.

अल्पायुष्य व दीर्घायुष्य ठरवणे :-

१)     आयुष्यमानाचा विचार करताना लग्न, लग्नेश, अष्टमस्थान व अष्टमेश यांचा विचार करावा.

२)     पुरूष कुंडलीत रवीचा व स्त्री कुंडलीत चंद्राचा विचार करावा. कारक ग्रहांवरिल सुयोग व कुयोग नीट अभ्यासावे.

३)      लग्नी पुरुष राशी उदित होत असेल व लग्नेश बलवान असून त्यावर कोणताही अशुभ योग होत नसेल

तर त्याची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते. या उलट, लग्नी स्त्री राशी असून लग्नेश दुर्बल असेल तर

त्यास रोग उत्पन्न होण्याचा संभव असतो.

४)    अष्टमस्थानी बुध, शनि, मंगळ यांचे राशीतील चंद्र बालकास अल्पायु करतो

५)   लग्नारंभी किंवा लग्नी पाप ग्रह असून त्यावर अष्टमेशाचा अंशात्मक अशुभ दृष्टीयोग होत असेल तर हे

मूल तीन वर्षावर जगत नाही.

६)लग्नेश षष्ठस्थानी असून त्यावर कोणत्याही शुभ ग्रहाचा शुभ दृष्टीयोग नसेल व अष्टमेशा\बरोबर अशुभ दृष्टीयोग करत असेल तर जातक अल्पायु होतो.

७) रवी व चंद्र केंद्रात असून त्यांचेबरोबर एखादा पापग्रह सम अंशावर असेल व तो कोणत्याही शुभ ग्रहाने

दृष्ट नसेल तर ते मूल १८ वर्षे जगते.

८) दोन किंवा तीन पापग्रहांची रवी व चंद्रावर अशुभ दृष्टी असेल व त्यापैकी एक पापग्रह रवी व चंद्र दोहोंवर अशुभ दृष्टीयोग करत असेल तर तो बाल मृत्युयोग ठरवावा.

९) जर दोन पापग्रह एकमेकांचे प्रतियोगात व रवी चंद्राबरोबर केंद्रयोग करत असतील तर तो बालारिष्टयोग होतो.

१०) मुलाचे कुंडलीत रवी व मुलीचे कुंडलीत चंद्र पापग्रहाने युक्त १, ६, ८, १२ स्थानी असून त्या पापग्रहावर

कोणताच शुभ दृष्टीयोग नसेल तर ते बालक अल्पायु ठरते.

अरिष्ट भंग योग:-

गुरू हा शुभ असून लग्नी आयुर्दाय ग्रहाबरोबर (रवी व चंद्र) शुभयोग करत असेल तर वरील सर्व अरिष्टांचा

नाश होतो, मात्र कुंडलीमध्ये लग्नेश तृतीयात, षष्ठात, अष्टमात वा व्ययात नसावा व लग्नेशाबरोबर कोणत्याही पापग्रहाचा अशुभ योग नसावा.

HYLEG – (प्राणशक्ती देणारा):-

हायलेगचे काम जीवन शक्ती देणे, जर ती त्याने दिली नाही तर आयुष्ययोग कमी होतो व तो किती कमी होणार हे, हायलेग किती बिघडला आहे त्यावर अवलंबून असते॰

ज्याला हायलेग म्हणता येईल अशा तीन गोष्टी आहेत.

१)      रवी २) चंद्र ३) लग्नबिंदु

यापैकी रवी हायलेग नसता, चंद्र हायलेग आहे का ते पहावे,  चंद्रही होत नसेल तर लग्नबिंदू (पर्यायाने लग्नेश) हायलेग मानावा लागतो.

कोणत्याही कुंडलीत वरील तीनपैकी फक्त एकच हायलेग असू शकतो.

हायलेग ठरविण्याची रिती :-                          

२) लग्न स्पष्ट  (–)  दशम स्पष्ट

१)     द्वितीयभाव स्पष्ट (–) लग्न स्पष्ट                  --------------------------------    ते

--------------------------------    ते                          २

                   २

लग्न स्पष्ट (–) द्वादश स्पष्ट                           सप्तम स्पष्ट (–) षष्ठ स्पष्ट

--------------------------------                  --------------------------------  

            २                                             २

रवी हायलेग – दिवसा जन्म व रवी, वरील हायलेग दर्शित स्थानी असता रवी हायलेग असतो.

चंद्र हायलेग – रात्री जन्म व चंद्र, वरील हायलेग दर्शित स्थानी असता चंद्र हायलेग असतो.

जर रवी अथवा चंद्र यापैकी कोणी हायलेग होत नसतील तर लग्नेश हायलेग मानावा.(कोणतेही नियम न लावता !)

KILLER – (प्राणशक्ति नाशक)

हायलेगचे विरुद्ध – जर रवी हायलेग असेल तर उर्वरित दोघे हे किलर असतात. या शिवाय पापग्रह, म्हणजे मंगळ,शनि, , राहू, केतू तसेच बिघडलेला बुध आणि ४, ६, ८, १२ या स्थानांचे स्वामी हेही किलर असतात.

आपण आता एक मध्यायू योगाची कुंडली पाहूया. या व्यक्तिचा मृत्यू वयाचे ३२वे वर्षी झाला.

जातक – पुरूष, लग्न कर्क , चंद्र राशी वृषभ.

       ग्रहस्थिती - लग्नी प्लुटो, द्वितियात गुरू, मंगळ, केतू, नेपच्यून.

               तृतियात कन्येचा(नीच) शुक्र, चतुर्थात नीच रवी.

             पंचमात बुध, अष्टमेश शनी सप्तमात स्वगृही,

             अष्टमात राहू, नवमात हर्षल व लाभस्थानी वृषभेचा(उच्च) चंद्र.

त्रिशांश कुंडली ही जड देहाचा मृत्यू दर्शवते.

या ठिकाणी त्रिशांश कुंडलीमध्ये जीवनदायक ग्रह गुरू अष्टमस्थानी, शत्रुगृही

 आत्माकारक रवी (षष्ठेश) तसेच लग्नेश व हायलेग असलेला चंद्र नीच राशीमध्ये आहेत.

भावचलित कुंडलीमध्ये रवी पंचमात व गुरू (वक्री) दशमात जात आहेत.

अंशात्मक ग्रहयोग :

षडाष्टक योग – रवी-हर्षल, रवी-चंद्र, गुरू-हर्शल, शुक्र-राहू, शनी-मंगळ

केंद्र योग – चंद्र-गुरू, बुध-राहू

त्रिरेकादश योग – चंद्र- हर्षल, रवी- गुरू, शुक्र- बुध

मृत्यूचे काळी विंशोत्तरी गुरू महादशेत शुक्र अंतर्दशेत राहूची विदशा होती.

राहू विदशेआधी, मंगळ विदशेत मार बसला.

गुरू महादशा प्रारंभ दि. –. ०६-०३- १९५६

गुरू महादशेत शुक्र अंतर्दशा प्रारंभ दि. – १८-०३-१९६३.

शुक्र अंतर्दशेत मंगळ विदशा प्रारंभ दि.-०६-०१-१९६४

शुक्र अंतर्दशेत राहू विदशा प्रारंभ दि.-०२-०३-१९६४

मृत्यू दिनांक २०-०७-१९६४

आयुष्य विशेष :- ही कुंडली मध्यायू योगाची आहे. ही व्यक्ति वयाचे ३२वे वर्षी मृत्यू पावली.

गुंडांबरोबरचे मारामारीमध्ये पोटात मुकामार लागुन रक्त नासले, ४ महिने हॉस्पिटलमध्ये, व तेथेच नंतर मृत्यू आला.

कुंडलीतील गृहित गोष्टी :

येथे चंद्र हायलेग झाला अहे. लग्नी स्त्री राशी, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी.

रवी-गुरू शुभयोग, स्वगृही शनीची लग्नावर दृष्टी, त्यामुळे उच्च नितिमत्ता, अन्यायाची चीड.

बुध (तृतियेश) मंगळाचे राशी व  दृष्टी मध्ये, त्यामुळे गुंडांशी प्रत्यक्ष मारामारीस उद्युक्त केले.

येथे पुरुषाचे कुंडलीतील रवी हा नीच राशीत, षष्ठेशाच्या(गुरूच्या) नक्षत्रात, शनी या शत्रुग्रहाचे अशुभ दृष्टीयोगात, चंद्राचे षडाष्टकयोगात तसेच त्रिशांश कुंडलीतही तो अष्टमस्थानी, नीच राशीत म्हणून पूर्ण बिघडलेला आहे.

लग्नावर शनीची दृष्टी असल्याने मारामारीची घटना सुमारे ८ दिवस लपविली, त्यामुळे पोटात अंतर्गत रक्तस्राव, रक्त नासले.

आयुर्दायदृष्ट्या अशुभ योगांपैकी खालील योग कुंडलीत होतात.

१) लग्नेश स्थीर व अष्टमेश चर राशीत २) लग्नी स्त्री राशी उदित व लग्नेश अशुभ योगात ३) लग्नबिंदू

अष्टमेशाचे नक्षत्रात आहे

विवेचन – कर्क लग्न व लग्नेश चंद्र लाभस्थानी, उच्चगृही असला तरी तो षष्ठेश गुरूच्या केंद्रयोगात, रवीच्या षडाष्टकयोगात व मंगळाचे नक्षत्रात, म्हणून पूर्णपणे बिघडला आहे.

३) पापग्रह लग्नारंभी असून त्यावर अष्टमेशाचा अशुभ दृष्टीयोग होतो.

विवेचन – येथे प्लुटो हा पापग्रह लग्नारंभी असून शनीने (अष्टमेश) दृष्ट आहे.

तसेच रवी हा आत्माकारक ग्रह जन्मकुंडली प्रमाणेच जडदेहाचा मृत्यू दर्शवणा-या त्रिशांश कुंडलीमध्येही  तुळेचा (नीच) व अष्टमात आहे. लग्नेश व हायलेग चंद्र सुद्धा नीच राशीत पडलेला आहे.

शनीच्या राशीतील अष्टमातील राहू हा तृतियेश व व्ययेश बुधाबरोबर केंद्रयोगात व बुध हा स्वनक्षत्री बलवान असल्याने तुल्यबळ अशुभ योग झाला आहे.

शनी-मंगळाचा षडाष्टक योग सुद्धा प्रत्यक्ष मारामारी दर्शवतो. शनी अष्टमेश आहे.

नक्षत्र-गंडांत योगात तसेच वक्री असल्याने मुळच्याच बिघडलेल्या हर्षलाने रवी व षष्ठेश गुरू हे दोघेही बिघडले आहेत.

हर्षलाने बिघडलेला षष्ठेश गुरू हा त्याचा शत्रू असलेल्या शुक्राचे नक्षत्रात असुन त्रिशांश कुंडलीत अष्टमातच जात आहे.

इतक्या बिघडलेल्या गुरूच्या महादशेत शुक्र (शुक्र, गुरूचा शत्रु, स्वतः नाशकस्थानाधिपती व राहूचे षडाष्टकात) अंतर्दशेत, मंगळाचे विदशेत मार बसला.

पहिले व दुसरे ऑपरेशन अष्टमातील अनिष्ट राहूच्या विदशेत व मृत्यूही त्याच विदशेत झाला.

षष्ठेश गुरू असल्याने पोटात मुकामार बसुन रक्त नासले, त्यानंतर कावीळ, अतिसार अशी पोटाशी संबंधित दुखणी वाढुन त्याचे पर्यवसान मृत्यू मध्ये झाले.