आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२
आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०२१-२२ | |||||
झिम्बाब्वे महिला | आयर्लंड महिला | ||||
तारीख | ५ – ११ ऑक्टोबर २०२१ | ||||
संघनायक | मेरी-ॲन मुसोंडा | लॉरा डिलेनी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | आयर्लंड महिला संघाने ४-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | मेरी-ॲन मुसोंडा (१६९) | गॅबी लुईस (२६३) | |||
सर्वाधिक बळी | जोसेफिन कोमो (४) | कॅरा मरे (८) | |||
मालिकावीर | गॅबी लुईस (आयर्लंड) |
आयर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने चार महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (महिला वनडे) खेळण्यासाठी ऑक्टोबर २०२१ दरम्यान झिम्बाब्वेचा दौरा केला. दोन्ही संघांनी ही मालिका नोव्हेंबरमध्येच झिम्बाब्वेमध्ये झालेल्या २०२१ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी वापरली. आयर्लंड महिलांनी तब्बल तीन वर्षांनंतर महिला वनडे सामने खेळले. याआधी आयर्लंड महिलांनी जून २०१८ दरम्यान न्यू झीलंडविरुद्ध खेळले होते. तर एप्रिल २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने संपूर्ण सदस्यांच्या महिला संघाना देखील कायमस्वरूपी महिला कसोटी आणि महिला एकदिवसीय दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झिम्बाब्वेला महिला एकदिवसीय दर्जा प्राप्त झाला. त्यानुसार झिम्बाब्वे महिलांनी या मालिकेत त्यांचे पहिले महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले. सर्व सामने हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळवण्यात आले.
कर्णधार मेरी-ॲन मुसोंडा हिने झळकावलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेने आपल्या पहिल्या वहिल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. महिला एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी मेरी झिम्बाब्वेची पहिली वहिली महिला क्रिकेट खेळाडू ठरली. आयर्लंडने दुसरा आणि तिसरा सामना जिंकत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. चौथ्या आणि अखेरच्या महिला एकदिवसीय सामन्यात आयर्लंडच्या एमी हंटरने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. तिने १२१ धावांची नाबाद खेळी करत आयर्लंडला पहिल्या डावात ३१२ धावांची मजल मारण्यास यशस्वी केले. एकदिवसीय क्रिकेट प्रकारात (महिला/पुरुष) शतक झळकावणारी एमी ही सर्वात तरुण क्रिकेट खेळाडू ठरली. विशेष म्हणजे हा विक्रम एमीने तिच्या १६व्या वाढदिवशीच केला. आयर्लंडने या सामन्यामध्ये झिम्बाब्वेला ८५ धावांनी नमवत चार सामन्यांची महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ३-१ अश्या फरकाने जिंकली. आयर्लंडने ऑगस्ट २००६ नंतर तब्बल १५ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका जिंकली. आयर्लंडच्या गॅबी लुईस हिला मालिकावीराचा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात आले.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
आयर्लंड २५३/८ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २५४/६ (४३.५ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.
- झिम्बाब्वेचा पहिला वहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- झिम्बाब्वेमध्ये खेळवला गेलेला पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- झिम्बाब्वे आणि आयर्लंड मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- आयर्लंडने झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- झिम्बाब्वेचा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
- झिम्बाब्वेने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- चिदेझा हुरुरू, प्रेशियस मरान्गे, इस्थर म्बोफाना, पेल्लागिया मुजाजी, मोदेस्तर मुपाचिक्वा, मेरी-ॲन मुसोंडा, ॲशली न्दिराया, जोसेफिन कोमो, लॉरीन फिरी, नॉमवेलो सिबांदा, लॉरीन त्शुमा (झि), जॉर्जिना डेम्प्सी, एमी हंटर, ओर्ला प्रेंडरगास्ट आणि सीलीस्ती रॅक (आ) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
आयर्लंड २८६/७ (५० षटके) | वि | झिम्बाब्वे २०६/९ (५० षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, क्षेत्ररक्षण.
- महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आयर्लंडचा झिम्बाब्वेवरील हा पहिला विजय.
- जेन मॅग्वायर (आ) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
झिम्बाब्वे १७८ (४७ षटके) | वि | आयर्लंड १७९/२ (३९ षटके) |
- नाणेफेक : झिम्बाब्वे महिला, फलंदाजी.
- तसमीन ग्रँगर, न्याशा ग्वानझुरा आणि ऑड्रे मझ्विशाया (झि) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.