Jump to content

आयत्या घरात घरोबा

आयत्या घरात घरोबा हा १९९१चा सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. यात लक्ष्मीकांत बेर्डे,सचिन पिळगावकर,अशोक सराफ , सुप्रिया पिळगावकर , किशोरी शहाणे यांनी प्रमुख भूमिका निभावल्या आहेत. सिनेमात गोपुकाका (अशोक सराफ ) प्रत्येक वर्षी केदार किर्तीकर (सचिन) घरात येऊन रहातो.[]

आयत्या घरात घरोबा
दिग्दर्शन सचिन पिळगांवकर
निर्मिती सचिन पिळगांवकर
कथा सचिन पिळगांवकर
पटकथा सचिन पिळगांवकर
वसंत सबनीस
प्रमुख कलाकारअशोक सराफ
सचिन पिळगांवकर
लक्ष्मीकांत बेर्डे
सुप्रिया पिळगांवकर
राजेश्वरी
संवादवसंत सबनीस
संकलन सचिन पिळगांवकर
छाया रणदेव भादुरी
गीतेशांताराम नांदगावकर
संगीतअरुण पौडवाल
ध्वनी पांडुरंग बोलूर
पार्श्वगायन सचिन पिळगांवकर
सुरेश वाडकर
अनुराधा पौडवाल
महंमद अजीज
शैलेंद्र सिंग
प्रशांत दामले
नृत्यदिग्दर्शन माधव किशन, विजय बोराडे
वेशभूषा दामोदर जाधव
रंगभूषा मोहन पाठारे
देशभारत
भाषामराठी
प्रदर्शित १९९१


पात्र

कथा


केदार किर्तीकर (सचिन पिळगावकर) एक मोठे श्रीमंत व्यवसायीक असतात ते दर वर्षी बहिण कानन किर्तीकर (राजेश्वरी) सोबत तीन महिने सुट्टीला परदेशात जातात. त्यांचे नौकर त्यांच्या गावी चालले जातात.  गोपू काका (अशोक सराफ) एक गरीब माणूस असतो जो दयाळू असतो एका गरीब मुलीच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी तो अखण्ड सायकल चालून वर्ल्ड रेकॉर्ड बनवतो व पैसे जमा करून त्या मुलीच्या आजोबांना देतो त्यांची मदत करतो. गोपू काका त्यानंतर एका बंगल्यात गुपचूप शिरतो तेथे आरामात राहतो आपला बंगला आहे असा वावरतो. केदार किर्तीकरचे माणसं काशिराम (लक्ष्मीकांत बेर्डे)च वडापावच दुकान तोडतात.ते लोक काशिरामला सांगतात ही जागा आमच्या मालकाच्या मालकीची आहे. त्याच समान दुकानाबाहेर फेकून दुकान तोडून टाकतात. त्याला सांगतात तू केदार किर्तीकर साहेबांना भेट . काशिराम केदार किर्तीकरच्या बंगल्यावर येऊन ओरडलायला लागतो.तो बंगल्यात रहात असलेल्या गोपू काकांना केदार किर्तीकर समजतो. गोपू काका स्विमिग पूल मधून बाहेर येत त्याला सांगतात की मी (गोपू काका) केदार किर्तीकरचा काका आहे. आफ्रिकेला राहतो, तीन महिने मुंबई येऊन राहतो. गोपू काका काशिरामला ढकल गाडी घेऊन देतात. गोपुकाका काशिरामला गोपू काका बंगल्यात राहू देतात. त्याला मात्र जेवण तुला बनवाव लागेल असे सांगतात. केदार किर्तीकर यांची बहीण बंगल्यात येत. गोपुकाका, काशिराम तिला चोर समजतात. ती गोपू काका आणि काशिराम यांचे संभाषण एकते , गोपू काका सांगतात ते या बंगल्याचे खरे मालक नाहीत ते पण गरीब आहेत.ते तीन महिने गुपचूप येऊन या बंगल्यात राहतात. कानन त्यांना सांगते ती गरीब आहे. तिला पण या बंगल्यात राहू द्या. केदार किर्तीकर व त्याची पत्नी बंगल्यात येऊन राहतात. गोपू काका कानन आणि काशिराम यांचा विवाह लाऊन देतात. व बंगला सोडून चालले जातात.

निर्माण

संदर्भ

  1. ^ https://m.timesofindia.com/entertainment/marathi/movies/photofeatures/ashok-sarafs-films-that-you-must-watch/aayatya-gharat-gharoba/photostory/63500753.cms