आयटीसी संगीत संशोधन अकादमी
आयटीसी संगीत रिसर्च अकादमी (इंग्रजी लघुरूप : ITC-SRA) एक हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत अकादमी असून, ती कलकत्याच्या इंडियन टोबॅको कंपनी - आयटीसी लिमिटेड या खाजगी कंपनी द्वारे चालवली जाते.[१] [२] हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत व गुरुशिष्य परंपरेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने १९७८ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.[ संदर्भ हवा ]
हिराबाई बडोदेकर (किराणा घराणे), निसार हुसेन खान (रामपुर-सहसवान्), निवृत्ती बुवा सरनाईक (जयपूर घराणे), लताफत हुसैन खान (आग्रा घराणे), अजय चक्रवर्ती (पतियाळा घराणे) , उल्हास कशाळकर (ग्वाल्हेर घराणे) , इत्यादी प्रमुख संगीतकार गुरू म्हणून येथे कार्यरत होते.[ संदर्भ हवा ]
अजय चक्रवर्ती, राशीद खान, अरुण भादुड़ी, शुभ्रा गुहा, कौशिकी चक्रवर्ती, शशांक मक्तेदार, ओंकार दादरकर, समर्थ नगरकर, अरशद अली खान, शांतनु भट्टाचार्य, अनिरुद्ध भट्टाचार्य, अबीर हुसैन (सरोद), सप्रतीक सेन गुप्ता (सतार) यांसारखे अनेक कलाकार या अकादमीत प्रशिक्षित झाले आहेत.[ संदर्भ हवा ]
बाह्य दुवे
संदर्भ
- ^ http://beta.thehindu.com/arts/music/article63005.ece
- ^ "संग्रहित प्रत". 2002-05-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-11-14 रोजी पाहिले.