आयएनएसव्ही तारिणी
second sailboat of the Indian Navy | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | sloop | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
महत्वाची घटना |
| ||
| |||
आयएनएसव्ही तारिणी ही भारतीय नौदलाची एक शिडाची नौका आहे.. तारिणी या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ (पाण्यातून) तारून दुसऱ्या तीरावर पोहोचवणारी असा होतो. या नौकेत इंजिन नसून ती फक्त शिडावर चालते तरीही समुद्रात दूरवर जाऊ शकते. या नौकेचे बांधकाम गोव्याच्या ॲक्वेरियस शिपयार्डमध्ये हॉलंडच्या टोंगा-५६ या नौकेच्या धर्तीवर करण्यात आले. बांधकामासाठी फायबर ग्लास, ॲल्युमिनियम व स्टील यांचा वापर करण्यात आला आहे. या नौकेची लांबी सुमारे ५६ फूट असून वजन सुमारे २३ टन इतके आहे.
तारिणीवर आधुनिक सॅटेलाईट यंत्रणा बसविण्यात आलेली आहे व त्या यंत्रणेमार्फत, जगातील कोणत्याही भागात संपर्क साधता येतो.