Jump to content

आयएनएस मुंबई

आयएनएस मुंबई (डी६२) ही भारतीय आरमाराची दिल्ली वर्गीय क्षेपणास्त्रवाहू विनाशिका आहे. ही लढाऊ नौका मुंबईजवळील माझगांव डॉक्स लिमिटेड येथे बांधली गेली. याची बांधणी १९९२मध्ये सुरू झाली व २००१मध्ये ही भारताच्या आरमारी सेवेत दाखल झाली. ही दिल्ली वर्गाची तिसरी नौका आहे.

मोहीमा

ऑपरेशन सुकून

आयएनएस मुंबई जुलै २००६मध्ये भूमध्य समुद्रातून टास्क फोर्स ५४सह परत असताना इस्रायेल-लेबेनॉन युद्ध सुरू झाले. त्या प्रदेशातील भारतीय नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी या नौकेला तैनात करण्यात आले. ऑपरेशन सुकून नावाच्या या मोहिमेंतर्गत आयएनएस मुंबईने १,७६४ भारतीय आणि २,२६४ एकूण असैनिकी व्यक्तींना सुखरूप मुंबईस परत आणले.

ऑपरेशन राहत

मार्च २०१५मध्ये झालेल्या यमनमधील युद्धादरम्यान आयएनएस मुंबईने आयएनएस तरकश आणि आयएनएस सुमित्रासह त्या प्रदेशातील भारतीय नौका आणि विमानांचे रक्षण केले तसेच यमनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका केली.