आय.एस.ओ. ३१६६
आय.एस.ओ. ३१६६ (इंग्लिश: ISO 3166) हे आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटनेने तयार केलेले प्रमाण आहे. ह्या प्रमाणामध्ये जगातील सर्व देश व त्यांच्या उपविभागांसाठीचे (उदा. राज्ये, प्रांत इत्यादी) कोड दर्शवले आहेत. आय.एस.ओ. ३१६६ चे खालील तीन विभाग आहेत.
- आय.एस.ओ. ३१६६-१: जगातील सर्व देशांचे दोन अक्षरी कोड
- आय.एस.ओ. ३१६६-२: वरील देशांच्या राजकीय उपविभागांचे कोड
- आय.एस.ओ. ३१६६-३: जगातील भूतपूर्व देशांचे चार अक्षरी कोड