Jump to content

आय.एस. जोहर

आय.एस. जोहर
चित्र:I.S.Johar-pic.jpg
जन्म इंद्रजित सिंग जोहर
१६ फेब्रुवारी १९२० (1920-02-16)
तलगंग, पश्चिम पंजाब, पाकिस्तान
मृत्यू १० मार्च, १९८४
मुंबई, महाराष्ट्र, भारत
नागरिकत्व भारतीय
शिक्षण एम.ए. (अर्थशास्त्र आणि राजकारण), एल.एल.बी.
कारकिर्दीचा काळ १९३१-८४
मूळ गावलाहोर, पाकिस्तान
जोडीदार

रमा बैन्स, सोनिया साहनी आणि ३ इतर पत्नी

(एकूण ५ लग्ने आणि ५ घटस्फोट)
अपत्ये अनिल, अंबिका


इंद्रजित सिंग जोहर तथा आय.एस. जोहर (१६ फेब्रुवारी, १९२०:तलगंग, पश्चिम पंजाब, पाकिस्तान - १० मार्च, १९८४:मुंबई, महाराष्ट्र, भारत) [] [] एक भारतीय अभिनेता, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक होते. त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये मुख्यत्वे विनोदी भूमिका केल्या. आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्ये लॉरेन्स ऑफ अरेबिया चित्रपटाती मधील गासिमच्या भूमिकेबद्दल प्रसिद्ध आहेत.

जोहर यांनी आताच्या पाकिस्तानमध्ये असलेल्या लाहोर मध्ये अर्थशास्त्र आणि राजकारणात एमए पदवी घेतली व नंतर एलएलबीचे शिक्षण घेतले. [] ऑगस्ट १९४७मध्ये, भारताच्या फाळणीच्या वेळी, जोहर आपल्या कुटुंबासह पटियाला येथे लग्नासाठी जात असताना लाहोरमध्ये मोठी दंगल उसळली त्यात शाह आलमी बाजार हा एकेकाळचा हिंदू भाग जोहर यांच्या घरासह पूर्णपणे जळून खाक झाला. []

जोहर पुन्हा कधी लाहोरला परतले नाहीत. काही काळ त्यांनी जालंधरमध्ये काम केले. त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले., [] १९४९ मध्ये त्यांनी मुंबईला जाउन हिंदी विनोदी थरारपट चित्रपट 'एक थी लडकी'मधून अभिनय पदार्पण केले. []

कारकीर्द

जोहरने १९५० ते १९८४पर्यंत असंख्य हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय हॅरी ब्लॅक (१९५८), नॉर्थ वेस्ट फ्रंटियर (१९५९), लॉरेन्स ऑफ अरेबिया (१९६२) [] आणि डेथ ऑन द नाईल (१९७८) यांसारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्येही त्यांनी कामे केली. या बरोबरच त्यांनी १९६७मध्ये माया या अमेरिकन दूरचित्रवाणी मालिकेत अभिनय केला. जोहरने काही पंजाबी चित्रपटांमध्येही कामे केली यांत पृथ्वीराज कपूरसोबत चड्डीयान दी डोली (१९६६), नानक नाम जहाज है (१९६९) आणि हेलनसोबत यमला जट यांचा समावेश आहे. []

संदर्भ

  1. ^ a b Sanjit Narwekar (1994). Directory of Indian film-makers and films. Flicks Books. ISBN 9780948911408. 9 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 December 2011 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव "Narwekar1994" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  2. ^ इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील आय.एस. जोहर चे पान (इंग्लिश मजकूर)
  3. ^ de Jonge, Rene (1989). Urban planning in Lahore: a confrontation with real development. Peter Groote. ISBN 9789036701839. 4 August 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 11 October 2017 रोजी पाहिले.
  4. ^ Survival fittest Archived 2012-10-22 at the Wayback Machine. Times of India, 2 June 2002.
  5. ^ "A serious satirist". 25 July 1997. 25 August 2009 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 November 2008 रोजी पाहिले.
  6. ^ Filmography Archived 2012-10-13 at the Wayback Machine. New York Times.
  7. ^ "In search of a bigger role". The Tribune. 19 May 2007. 1 November 2008 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 November 2008 रोजी पाहिले.