आय.ए.यू.ची ग्रहाची व्याख्या
२००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटना (आय.ए.यू.)ने ग्रहाची औपचारिक व्याख्या केली. त्यानुसार जर एखादी खगोलीय वस्तू खालील तीन अटी पूर्ण करत असेल तर त्याला ग्रह मानण्यात यावे.
- ती खगोलीय वस्तू सूर्याभोवती प्रदक्षिणा मारत असावी.
- त्या खगोलीय वस्तूचे वस्तुमान कमीत कमी इतके असावे की ज्यायोगे तिचा आकार गुरुत्वाकर्षणामुळे गोलाकार (spherical) व्हावा.
- त्या खगोलीय वस्तूने आपली कक्षेजवळील भाग साफ केलेला असावा. याचा अर्थ असा की तिच्या कक्षेजवळील अंतराळातील लहान वस्तू तिच्या गुरुत्वाकर्षणाने तिच्यामध्ये विलीन झाल्या असाव्यात.[१][२]
प्लूटो तिसरी अट पूर्ण करत नाही. त्याचे वस्तूमान त्याच्या कक्षेतील इतर वस्तूंच्या केवळ ०.०७ पट आहे. (पृथ्वीचे वस्तुमान पृथ्वीच्या कक्षेतील वस्तूंच्या १७ दशलक्ष पट आहे.)[३][४] आय.ए.यू.ने पुढे ठरविले की प्लूटोला बटु ग्रह या नवीन तयार केलेल्या वर्गात टाकले जावे तसेच तो नेपच्यूनपलीकडील वस्तू या वर्गातील प्लूटॉईड या उपवर्गाचा मूळ नमुना (prototype)सुद्धा मानण्यात यावा.
संदर्भ
- ^ "IAU 2006 General Assembly: Resolutions 5 and 6" (PDF). August 24, 2006.
- ^ "IAU 2006 General Assembly: Result of the IAU Resolution votes" (Press release). International Astronomical Union (News Release - IAU0603). 2006-08-24. 2008-06-15 रोजी पाहिले.
- ^ Steven Soter. "What is a Planet?". Department of Astrophysics, American Museum of Natural History. 2007-02-21 रोजी पाहिले.
- ^ "IAU 2006 General Assembly: Result of the IAU Resolution votes". August 24, 2006. 2006-11-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2008-10-29 रोजी पाहिले.