Jump to content

आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा

तुकाराम महाराजांचे वैकुंठाला प्रयाण. चित्रकार: राजा रविवर्मा

आम्ही जातो आपुल्या गावा..आमचा रामराम घ्यावा हे संत तुकारामांचे शब्द आहेत. एका मतप्रवाहानुसार, तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले. त्याच्याआधी ते आपल्या भक्तांना आणि जवळच्या लोकांना बोलताना हे शब्द उच्चारतात.

त्यांचे हे शब्द फार लोकप्रिय आहेत. "आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा", या वाक्यावरून चित्रपट[] आणि बरीच गाणी तयार झाली.[][] बऱ्याच वेळा, निरोप देताना किंवा भावुक प्रसंगी पुस्तकांमध्ये, चित्रपटांमध्ये हे वाक्य वापरले जाते.

अभंग आणि त्याचा अर्थ

मूळ अभंग:

आम्ही जातो आपुल्या गावा । आमचा राम राम घ्यावा ।।

तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी ।।

आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ।।

येतां निजधामीं कोणी । विठ्ठल विठ्ठल बोला वाणी ।।

रामकृष्ण मुखी बोला । तुका जातो वैकुंठाला ।

तुकाराम महाराज. चित्रकार: राजा रविवर्मा

अर्थ:

आम्ही आमच्या गावाला परत जात आहोत, तुम्ही आमचा रामराम स्वीकार करावा. तुमची आणि आमची हीच शेवटची भेट आहे. यानंतर जन्मभर ताटातूट होणार आहे. मी तुमच्या पाय पडतो. आता दया करा आणि मला जाऊ द्या. तुमच्या घरी कुणी आले तर विठ्ठल विठ्ठल बोलत जा. मुखामध्ये रामकृष्ण असावे. मी तुकाराम आता वैकुंठाला चाललो आहे.

प्रसंग

संत तुकाराम हे सदेह वैकुंठास गेले होते, असा काही जणांकडून दावा केला जातो. फाल्गुन कृ.२ , शके १५७१ या दिवशी म्हणजे १९ मार्च १६५० रोजी त्यांचा निर्वाण झाला होता, असे म्हणतात. तसेच स्वतः पांडुरंगाने त्यांच्या वैकुंठ प्रयाणासाठी खास गरुड विमान पाठवले होते.

सदेह वैकुंठास जाणे हे तुकारामांच्या भक्तीचे फळ होते, असा एक मतप्रवाह आहे. तुकारामांच्या या वैकुंठ गमनास तुकाराम बीज म्हणून भक्तिभावाने लोक साजरा करतात.

लोकप्रियता

मूळ वाक्यात थोडा बदल झाला आहे. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा रामराम घ्यावा, त्यांचे हे शब्द फार लोकप्रिय आहेत. या वाक्यावरून चित्रपट[] आणि बरीच गाणी तयार झाली. बऱ्याच वेळा, निरोप देताना किंवा भावुक प्रसंगी पुस्तकांमध्ये, चित्रपटांमध्ये हे वाक्य वापरले जाते.

चित्रपट आणि इतर माध्यमांत

  • १९६८ साली या नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.
    चित्रपटातील प्रसंग
  • तुकाराम महाराजांवरच्या दोन चित्रपटांमध्ये विस्तृतपणे हा प्रसंग दाखवला आहे. दोन्ही चित्रपटांंत हे गाणे आहे.
  • मन्ना डे यांचेदेखील "आम्ही जातो आमुच्या गावा" हे गाणे आहे.[]
  • युट्युबवरदेखील बऱ्याच गायकांनी स्वतःच्या आवाजात हे गाणे प्रदर्शित केले आहे.

संदर्भ

  1. ^ a b "Aamhi Jato Amuchya Gava Movie - Trailer, Reviews, Songs, Story, Videos and Actors Actress Pictures". web.archive.org. 2012-08-25. 2012-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-13 रोजी पाहिले.
  2. ^ "Listen & Download Latest MP3 Hindi, English, Bollywood Songs Online". Wynk Music (इंग्रजी भाषेत). 2022-01-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Aamhi jaato aamuchya gaava". 2022-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-13 रोजी पाहिले.
  4. ^ "Manna Dey". 2022-01-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-01-13 रोजी पाहिले.